मुंबई – भारतीय चित्रपट सृष्टीतील अभिनयाच्या क्षेत्रातील मानाचं पान म्हणून ओळखले जाणारे अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. त्यांच्या जाण्यानं अभिनयाचं एक पर्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. (dilip kumar death once amitabh bachchan waited for half an hour for his autography)

आपल्या अभिनयानं त्यांनी पाच दशकांहून अधिक काळ भारतीय प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. त्यांचं जाणं भारतीय प्रेक्षकांच्या मनाला चटका लावून जाणारं आहे. त्यांच्या चित्रपटविषयक वेगवेगळ्या आठवणींना उजाळा या लेखाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
बॉलीवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी दिलीप कुमार यांच्या निधनावर एक भावूक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी कुमार साहेबांविषयीच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे.
अमिताभ यांनी लिहिलं आहे की, अभिनयाची एक संस्थाच आता आपल्यातून गेली आहे. भारतीय चित्रपटांचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा दिलीप कुमार यांचे नाव अग्रक्रमानं घेतले जाईल. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.
अमिताभ हे दिलीप कुमार यांच्या अभिनयाचे चाहते होते. बॉलीवूडमध्ये अमिताभ यांचे नाव मोठे आहे. त्यांची प्रसिद्धीही प्रचंड आहे. असे असले तरी भारतीय सिनेमासृष्टीत त्यांचे नाव दिलीप कुमार यांच्यानंतरच घेतले जाते.
अमिताभ यांनी दिलीप कुमार यांची एक आठवण सांगितली आहे. त्यात त्यांनी आपल्याला जेव्हा दिलीप कुमार यांचा ऑटोग्राफ घ्यायचा होता तेव्हा अर्धा तास थांबावे लागले होते.
केवळ भारतातच नाही तर शेजारील देश पाकिस्तानमध्येही दिलीप कुमारांच्या अभिनयाचे मोठ्या प्रमाणावर चाहते आहेत. पाकिस्तानातील पेशावर शहरात दिलीप कुमार यांचा जन्म झाला होता. त्यांचे मुळ युसूफ खान असे होते. त्यांनी दिलीप कुमार हे नाव घेऊन बॉलीवूडमध्ये इंट्री घेतली.
पेशावर मधील एक आठवण दिलीप कुमार यांनी सांगितली होती. त्यात त्यांनी सांगितले होते की, पेशावरमध्ये माझे बालपण गेले. त्यावेळच्या आठवणी आजही माझ्या मनात ताज्या आहेत. माझ्या आय़ुष्यातील सर्वात सुंदर ते दिवस होते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here