मेहुणबारे (ता.चाळीसगाव): यंदा पुरेशा पावसाअभावी (Rain) दुष्काळाचे ढग जमा होवू लागले आहेत. पावसाने ओढ दिल्याने पिकांवर (Crop) मोठा ताण पडला असून येत्या तीन चार दिवसात पाऊस झाला नाही तर दुबार पेरणीचे संकट ( Double sowing crisis ) घोंगावू शकते.आतापर्यंत 58 हजार हेक्टर क्षेत्रावर 62 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून 38 टक्के क्षेत्राला पावसाची प्रतिक्षा लागली आहे.पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.(economic crisis on farmers due to lack of rain)
Also Read: एकनाथ खडसेंना मोठा झटका..जावाई गिरीश चौधरींना ईडीकडून अटक
चाळीसगाव तालुक्यात यंदा पुरेसा पाऊस नसल्याने स्थिती कठीण होत चालली आहे. गेल्या दोन वर्षापासून चांगला पाऊस होत असल्याने बागायत क्षेत्र वाढले होते.तालुक्यात खरीप हंगामाचे क्षेत्र 81हजार हेक्टरहून अधिक असून त्यात सर्वाधिक पेरा कापसाचा झाला आहे. विहीरीला पाणी असलेल्या शेतकऱ्यांनी ठिबकच्या भरोशावर कपाशी लागवड केली आहे. या शेतकऱ्यांची कपाशीचे पिक चांगले असले तरी कोरडवाहू शेतकऱ्यांपुढे दमदार पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.तालुका पुन्हा एकदा दुष्काळाच्या संकटात सापडला आहे.
चाळीसगाव- गेली दोन वर्षे वरूण राजाची कृपा असलेल्या चाळीसगाव तालुक्यावर यंदा पुरेशा पावसाअभावी दुष्काळाचे ढग जमा होवू लागले आहेत. पावसाने ओढ दिल्याने पिकांवर मोठा ताण पडला असून येत्या तीन चार दिवसात पाऊस झाला नाही तर तालुक्यावर दुबार पेरणीचे संकट घोंगावू शकते. तालु्नयात आतापर्यंत 58 हजार हे्नटर क्षेत्रावर 62 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून 38 टक्के क्षेत्राला पावसाची प्रतिक्षा लागली आहे.पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.

दुबार पेरणीचे संकट
चाळीसगाव तालु्नयात यंदा पुरेसा पाऊस नसल्याने स्थिती कठीण होत चालली आहे. तालुक्यात गेल्या दोन वर्षापासून चांगला पाऊस होत असल्याने बागायत क्षेत्र वाढले होते. तालुक्याचे खरीप हंगामाचे क्षेत्र 81 हे्नटरहून अधिक असून त्यात सर्वाधिक पेरा कापसाचा झाला आहे. विहीरीला पाणी असलेल्या शेतकऱ्यांनी ठिबकच्या भरोशावर कपाशी लागवड केली आहे. या शेतकऱ्यांची कपाशीचे पिक चांगले असले तरी कोरडवाहू शेतकऱ्यांपुढे दमदार पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.तालुका पुन्हा एकदा दुष्काळाच्या संकटात सापडला आहे.
62 टक्के पेरणी
मृग नक्षत्राच्या सुरूवातीला पावसाने दणक्यात आगमन केले असले तरी त्यानंतर मात्र ओढ दिली. 58 हजार हे्नटर क्षेत्रावर 62 टक्के पेरणी झाली आहेत. ही पेरणी पुरेशा पावसाअभावी धो्नयात आली आहे.तर उर्वरीत पेरणी खोळंबली आहे. येत्या चार पाच दिवस जर पाऊस झाला नाही तर पिकांची वाढ मोठ्या प्रमाणावर खुंटणार आहे. दमदार पावसाअभावी आताच पिके कोमजू लागले आहे.
Also Read: पाऊस लांबल्याने जळगाव जिल्ह्यात पाणी टँकरच्या संख्येत वाढ
गिरणेत 33 टक्के साठा
पावसाने ओढ दिल्याने तालु्नयातील विविध प्रकल्पांमधील पाणीसाठा शून्य टक्के झाला आहे. 14 लघु प्रकल्प कोरडे ठाक पडले आहेत तर तालु्नयाची मदार असलेल्या गिरणा धरणात आजपावेतो 33.31 टक्के इतका पाणीसाठा आहे. तर 22 खेड्यांची जीवनवाहीनी असलेल्या मन्याड धरणात 17.4 टक्के पाणीसाठा आहे.वाढत्या उन्हामुळे तालु्नयात पाणी पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.केले असले तरी त्यानंतर मात्र ओढ दिली. 58 हजार हेक्टर क्षेत्रावर 62 टक्के पेरणी झाली आहेत. ही पेरणी पुरेशा पावसाअभावी धोक्यात आली आहे.तर उर्वरीत पेरणी खोळंबली आहे. येत्या चार पाच दिवस जर पाऊस झाला नाही तर पिकांची वाढ मोठ्या प्रमाणावर खुंटणार आहे.दमदार पावसाअभावी आताच पिके कोमजू लागले आहे.
Also Read: केरळचे वायनाड पर्यटनासाठी आहे प्रसिध्द; जाणून घ्या माहिती
गिरणेत 33 टक्के साठा
पावसाने ओढ दिल्याने तालुक्यातील विविध प्रकल्पांमधील पाणीसाठा शून्य टक्के झाला आहे. 14 लघु प्रकल्प कोरडे ठाक पडले आहेत तर चाळीसगाव तालुक्याची मदार असलेल्या गिरणा धरणात आजपावेतो 33.31 टक्के इतका पाणीसाठा आहे. 22 खेड्यांची जीवनवाहीनी असलेल्या मन्याड धरणात 17.4 टक्के पाणीसाठा आहे.वाढत्या उन्हामुळे तालुक्यात पाणी पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.
Esakal