ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून आठवणींना उजाळा दिला.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी दिलीप कुमार यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्याला कॅप्शन दिले, ‘दिलीप कुमार हे माझे प्रेरणास्थान होते. एका महान यूगाचा अंत झाला.’
अभिनेता रितेश देशमुखने दिलीप कुमार आणि सायरा बानोसोबतचा फोटो शेअर करून कॅप्शन लिहीले, ‘आज कॅमेर्‍याला सामोरे जाणारा प्रत्येक अभिनेता दिलीप साहेब यांचे चांगली शिकवण दिल्याबद्दल आभार मानत आहे. ते एक अशी संस्था होते, ज्यामधून बरेच काही शिकायला मिळाले. ‘
पुढे रितेशने लिहीले, ‘आज मी खूप दु: खी आहे. मी त्यांना खूप मिस करेन’
संजय दत्तने दिलीप कुमार यांच्यासोबतचा फोटो शेअर करून लिहीले, ‘दिलीप साहेबांसोबत माझ्या बऱ्याच अठवणी आहेत. ते माझ्या वडिलांसारखे होते.’
अभिनेत्री माधूरी दिक्षीतने दिलीप कुमार यांच्यासोबतचा फोटो शेअर केला. या फोटोला तिने कॅप्शन दिले, ‘मला दिलीप कुमार यांच्यासोबत काम करायला मिळाले यामुळे मी स्वत; ला खूप भाग्यवान समजते. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.’
अभिनेता अनिल कपूरने एका चित्रपटाच्या शूटिंगमधील दिलीप कुमार आणि जॅकी श्रॉफ यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे.
जॅकी श्रॉफने दिलीप कुमार यांच्या सोबतचा फोटो शेअर करून लिहीले, ‘ते भारतीय चित्रपटसृष्टीचे आधारस्तंभ होते. त्यांच्याबरोबर स्क्रिन शेअर करायला मिळाल्यामुळे मी स्वत; ला भाग्यवान समजतो. मी त्याच्याबरोबर तीन चित्रपटात काम केले’
कपिल शर्माने दिलीप कुमार आणि सायरा बानो यांचा फोटो शेअर केला.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here