हिवरखेड ः अकोला जिल्ह्यातील हिवरखेड परिसरात अवैध रेती उत्खनावरून दोन गटात तुफान हाणामारी झाली. दोन गटातील सहाजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे. या घटनेत दोन ट्रॅक्टर नदी पात्रात उलटून दिल्याचे आढळून आले. (A total of six seriously injured from the two groups, two tractors thrown into the river)

हिवरखेडसह जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीला उधाण आले आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी हिवरखेड येथे दोन रेती माफियांच्या गटात तुफान राडा झाला होता. त्यावेळेस राहिलेली कसर अथवा बदला घेण्यासाठी ता.६ जुलै रोजी जुन्या वैमनस्यातून रेती माफियाच्या दोन गटात पुन्हा तुफान हाणामारी झाली.


दोन्ही गटातील एकूण सहा जण जखमी असल्याची मिळाली आहे. प्राथमिक माहिती त्यापैकी दोघांची परिस्थिती गंभीर असल्याची चर्चा आहे. याच गटातील व्यक्तींचे अनेक फूट उंच कराडवरून वाण नदीत दोन ट्रॅक्टर दोन ट्रॉली लोटून नष्ट करून दिल्याचे सुद्धा बोलले जाते.

सोबतच या दोन्ही गटातील व्यक्तींच्या घराच्या, वाड्याच्या काही भागांची जाळपोळ झाल्याची सुद्धा चर्चा आहे. घटनेतील एका गटाच्या हद्दीत पोलिसांना अवैध रेतीचा मोठा साठा दिसून आला. सागवान सुद्धा आढळले.

त्यामुळे पोलिसांनी महसूल आणि वनविभागाला माहिती दिल्यामुळे वन विभागाने आणि महसूल विभागाने धाड टाकली आहे.

अवैध रेतीसाठ्यावर कारवाई करून पोलिस पाटलांच्या ताब्यात दिला आहे. वृत्त लिहिस्तोवर पोलिस ठाण्यात या घटनेसंदर्भात कोणावरही गुन्हे दाखल झाले नव्हते.
संपादन – विवेक मेतकर
A total of six seriously injured from the two groups, two tractors thrown into the river
Esakal