नागपूर : आज अनेकांना केस गळतीची समस्या होत आहे. लहान वयातच केस पांढरे होणे, गळणे, टक्कल पडणे अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. महिलांमध्ये केसगळतीची समस्या (weaken hair) मोठी आहे. यातून सावरण्यासाठी त्या अनेक उपायांचा वापर करतात. यामुळेही ही समस्या वाढत आहे. चला तर जाणून घेऊया केस (hair problem) गळतीचे कारण… (These-mistakes-weaken-your-hair-Leakage-problem-occurs)

दर दोन महिन्यांनी एकदा केसांना ट्रिम करा, असे न केल्याने केसांच्या वाढीवर परिणाम होईल.
ओले केस घट्ट बांधल्याने मुळांपासून कमकुवत होतात. यामुळे ते तुटण्याची अधिक शक्यता असते. शक्य असल्यास कोरड्या केसांमध्ये सैल वेणी बांधा.
पांढरे केस काळे करण्यासाठी किंवा रंगवण्यासाठी कलर केले जातात. यामुळे केस गळतीची समस्या होऊ शकते.
कंडिशनर लावल्याने केसांना नुकसान होऊ शकतो. केस पातळ असल्यास टाळूला कंडिशनर लावण्यास टाळा.
दररोज पोनीटेल किंवा वरच्या साईडला केस बांधल्यास केस गळण्याचा धोका वाढतो.
केसांना वाढवण्यासाठी किंवा स्टाईलिश करण्यासाठी हिट दिली जाते. यामुळे केस गळतीची समस्या उद्भवू शकते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here