माॅन्सूनचा पाऊस कोणाला आवडणार नाही? पावसाळ्यात फिरायला जाण्याचा प्लॅन असल्यास अधिकच मज्जा! आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथून तुम्हाला घरी परतूच वाटणार नाही, इतकी ती सुंदर आहेत.

माॅन्सूनचा पाऊस कोणाला आवडणार नाही? पावसाळ्यात फिरायला जाण्याचा प्लॅन असल्यास अधिकच मज्जा! आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथून तुम्हाला घरी परतूच वाटणार नाही, इतकी ती सुंदर आहेत.
गोवा (Goa) : गोव्यात फिरायला जाण्यासाठी कोणताही वेळ-काळ लागत नाही. कारण, हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ वर्षभर पर्यटनासाठी खुले असते. पावसाळ्यात येथील सौदर्य पर्यकांना आणखीन घायाळ करुन सोडते.
मुन्नार, केरळ (Munnar, Kerala) : ईशान्येकडील राज्यांव्यतिरिक्त दक्षिणेत बरीच पर्यटनस्थळे आहेत. केरळमध्ये वसलेलं मुन्नार पावसाळ्यात अनेक पर्यटकांना आकर्षित करत असतं. येथील निसर्गरम्य वातावरण आपल्या डोळ्याचे पारणे फेडल्याशिवाय राहत नाही.
स्पिती व्हॅली, हिमाचल प्रदेश (Spiti Valley Himachal Pradesh) : स्पिती खोऱ्याचं सौंदर्य अतुलनीय आहे. बर्फाच्छादितील पर्वत ते नयनरम्य मठांपर्यंत स्पिती व्हॅली शांत आणि निर्मळपणा देते. येथे जेव्हा पाऊस पडतो, तेव्हा नद्या आणि पर्वतांचे विहंगम दृश्य अधिकच सुंदर दिसते.
कुर्ग कर्नाटक (Coorg Karnataka) : मनमोहक धबधब्यांपासून ते कॉफीच्या बागांपर्यंत दक्षिणेकडील हे ठिकाण पावसाळ्यात जास्त रोमँटिक होतं. जर तुम्हाला पावसात हरवून जायचं असेल, तर बंगळूरहून कुर्गकडे जाण्यासाठी आपल्या फक्त 5 तास लागतील.
शिलॉंग (Shillong) : शिलॉंगला ‘पूर्वेचा स्कॉटलंड’ म्हणून देखील ओळखलं जातं, हा भाग निसर्ग सौंदर्यांनी नटलेला असून इथला नजराणा आपलं मन तृप्त करुन सोडेल. पावसात भिजल्यानंतर, इथले डोंगर पर्यटकांना खूपच आकर्षित करतात.
पाॅंडिचेरी (Puducherry) : मोहक व्हिलापासून ते सुंदर समुद्र किनाऱ्यापर्यंत.. पाॅंडिचेरी बीच प्रेमींसाठी एक उत्कृष्ट ठिकाण आहे. पावसाळ्याच्या दिवसात येथे आपण फिरायला गेल्यास, कॅफे आणि बारला जरुर भेट द्या. येथे फ्रेंच पाककृतीचा देखील आपल्याला आनंद घेता येईल.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here