खेड ( रत्नागिरी ) – तालुक्यातील बहिरवली, रजवेल, शिर्शी, सुकिवली व चौगुले मोहल्ला या पाच ग्रामपंचायतीच्या निवडणूका शांततेत झाल्या. या पाच ग्रामपंचायतीपैकी सुकिवली व रजवेल या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.
बहिरवली ग्रामपंचायतीच्या प्रभाग 3 मधील 1, रजवेल ग्रामंपचायतीच्या प्रभाग 2 मधील एक व तीनमधील एक अशा दोन जागा, तर चौगुले मोहल्ला ग्रामपंचायतीच्या प्रभाग 1 मधील एक व प्रभाग 3 मधील 1 अशा दोन जागा मिळून एकूण पाच जागा रिक्त आहेत. तालुक्यातील बहिरवली ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून विजय सोनू जाधव यांची थेट जनतेतून निवड झाली आहे. प्रभाग क्र. 1 मधून संजीवन सुहास गोलटकर, रोहिणी नारायण लाड व संगीता बाबू मोहिते, प्रभाग 2 मधून विलास गणपत भागणे व कांचन काशिनाथ तांबे, प्रभाग 3 मधून मोहमंद शरीफ अब्दुल करीम दाभोळकर व एक जागा रिक्त आहे.
शिर्शी ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून श्रीधर महादेव भावे यांची अटीतटीच्या लढतीत थेट निवड झाली आहे. प्रभाग 1 मधून दत्ताराम चिनकटे, प्रणाली चिनकटे व स्वरुपा गुरव, प्रभाग 2 मधून इकबाल हमदुले व नाझिया सिद्दीकी, प्रभाग 3 मधून संतोष तांबे व शुभांगी गावडे निवडून आले. चौगुले मोहल्ला ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून इम्तियाज इस्माईल चौगुले यांची निवड झाली आहे. प्रभाग 1 मधून नाझनीन महमंद सलीम चौगुले, अहमद महमंद सालेह मुल्लाजी व एक जागा रिक्त राहिली. प्रभाग 2 मधून हसीना अमिनुद्दीन चौगुले व महमंद शफी इब्राहीम चौगुले, प्रभाग 3 मधून कुब्रा अशरफ अली चौगुले व एक जागा रिक्त राहिली.
सरपंचपदी महमुद दाऊद हमदुले
रजवेल ग्रामपंचायतही बिनविरोध झाली आहे. सरपंचपदी महमुद दाऊद हमदुले यांना येथील जनतेने थेट विराजमान केले आहे. प्रभाग 1 मधून राधिका मेंगडे, नुरजहॉ हमदुले व शांताराम डांगे, प्रभाग 2 मधून किसन निकम व एक जागा रिक्त राहिली आहे. प्रभाग 3 मधून गफुर इस्माईल हमदुले हे निवडून आले असून एक जागा रिक्त राहिली.
शीतल चाळके या सरपंचपदी विराजमान
सुकिवली ग्रामपंचायत ही पूर्ण बिनविरोध झाली असून जनतेने शीतल चाळके या सरपंचपदी विराजमान झाल्या. या ग्रामपंचायतीच्या प्रभाग 1 मधून प्रमिला निकम, रोशनी चाळके व बळीराम निकम, प्रभाग 2 मधून दीप्ती यादव, ज्योती घाणेकर व सचिन धाडवे, प्रभाग 3 मधून समीर राणीम, सुवर्णा जाधव व परेश जाधव निवडून आले.

News Story Feeds