चांदोरी (जि. नाशिक) : महाराष्ट्राचं राजकारण म्हटलं की पवार घराण्याचा उल्लेख हा अनिवार्य ठरतो.महाराष्ट्राच्या राजकारणातील प्यादी आजही लिलया हलवणारा आणि ‘ओल्ड मॅन इन वॉर’ असे संबोधले जाणाऱ्या शरद पवार यांच्याभोवती प्रचंड वलय आहे. मात्र, हे वलयाच्या बाजूलाच सुप्रिया सुळे या आपली वेगळी ओळख प्रस्थापित करण्यात यशस्वी ठरल्या आहेत. शरद पवार यांच्या तालमीत तयार झालेल्या सुप्रिया सुळे यांना राजकारणाची आणि समाजकारणाची पूरेपूर जाण आहे. याच संयमी आणि अभ्यासू वृत्तीच्या जोरावर त्या संसदेत राष्ट्रवादीचा आवाज बुलंद करताना दिसतात. सोबतच सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत. त्यांचा अनुभव घेतला चांदोरीतील आहेर दाम्पत्याने. (mp-supriya-sule-meet-gargi-aher-from-chandori-nashik-marathi-news)
फोटो झाला होता व्हायरल
गार्गी ही चांदोरी ता. निफाड येथील प्रियंका व सागर आहेर या दाम्पत्याची मुलगी. एक निवडणुकीत प्रचाराचे वारे वाहत असतांना राष्ट्रवादीचा झेंडा कुठलीही समज नसलेल्या गार्गीने हातात घेतला आणि शेताच्या बांधावर फडकविताना तिचा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. गार्गी सोशल मीडियावर राष्ट्रवादीची चिमुरडी चाहती म्हणून भारी भाव खाऊन गेली. त्या नंतर महाराष्ट्रातील राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या सिल्व्हर ओक या ठिकाणी शरद पवार साहेबांची गार्गीसोबत भेट ही झाली.

Also Read: भारती पवार ठरल्या जिल्ह्यातील पहिल्या महिला केंद्रीय मंत्री
गार्गीने दिल्या हटके पध्दतीने शुभेच्छा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या अनेक पोस्ट वर गार्गी चा फोटो व्हायरल झाला होता. आणि ३० जून रोजी सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त गार्गीने आपल्या हटके पध्दतीने शुभेच्छा दिल्या.
माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणारे, बारामती येथील स्टर्लिंग सिस्टिम्स या आयटी कंपनीचे प्रमुख सतीश पवार यांना सुप्रिया ताईंनी या चिमुकल्या गार्गी संदर्भात विचारणा केली. आणि बुधवार दिनांक ७ जुलै रोजी मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या ठिकाणी गार्गी सह परिवाराची भेट घेत गार्गीचे सुप्रिया ताईंनी गोड कौतुक करत संवाद साधला. यातुन ही राष्ट्रवादी सह सोशल मीडियावर सुप्रिया सुळे किती लक्ष देऊन असतात ही बाब अधोरेखित झाली.
(mp-supriya-sule-meet-gargi-aher-from-chandori-nashik-marathi-news)
Also Read: गोदावरी घाटांना पुन्हा हेरिटेज दर्जा मिळवून देण्याचा ‘स्मार्ट’ निर्धार
Esakal