कोल्हापूर : पंढरीचा (Pandharpur)वारकरी, वारी चुकू दे ना हरी…..अशी सावळ्या विठुरायाला आर्त साद घातल दरवर्षी जाता पंढीरीशा….सुख वाटे जीवा… अशीच मनी भावना ठेवत लाखो वारकऱ्यांचा जथ्था पंढरपुरच्या दिशेने आषाढी पालकी सोहळ्याच्या वारीत चालतो. कोविडच्या (Covid 19 )प्रादूर्भावाने सलग दुसऱ्या वर्षी यंदाही पालखी सोहळा झालेला नाही. देहूतून जगदगुरू संत तुकाराम महाराज व आळंदीतून (Aalandi)प्रस्थान ठेवणारा संतश्रेष्ठ ज्ञानोबाराय पालखी सोहळा म्हणजे महाराष्ट्राचे वैभव. लाखो बाविकांचे श्रद्धास्थान. मात्र दोन वर्षापासून महाराष्ट्रचे. चालतं बोलतं वैभव पाहण्याचे भाग्य कोणालाच लाभलेलं नाही.
देशातच नव्हे तर परदेशातही पालखी सोहळ्याची भुरळ आहे, आकर्षण आहे. प्रत्यक्ष वारी सोहळ्याची अनुभूती येत नसली तरी सकाळने छायाचित्रांव्दारे ती अनुभूती उपलब्ध करून दिली आहे.त्याची सचित्र झलक. महाराष्ट्र आणि देशातील वारकऱ्यांना विठ्ठल व वारी याची अनुभूती यावी यासाठी ही सर्व छायाचित्रे कॅमेऱ्यात कैद केली आहेत. सकाळचे पेजीनेशन आर्टिस्ट प्रकाश पाटील यांनी. यांच्या अनेक छायाचित्रांचे प्रदर्शन सकाळच्या वतीने भरवण्यात आले होते.

पालखी सोहळा म्हणजे स्वतंत्र परंपरा, गर्दी असली तरी दाटीवाटी नसते. त्या गर्दीतही असतो निटनिटकेपणा, त्यात लाखो वारकऱ्यांच्या जथ्याला ओढ असते, सावळ्या विठुरायाच्या दर्शनाचीच.

अशीच काही भावना घेवून अबालवृद्धांना सावळ्या विठुरायाची ओढीने चालतात. वाटेत विसाव्यालाही विठुरायाची ओढ कायम असते. अशाच एका मुक्कामच्या ठिकामी विठुरायाच्या मूर्तीसमोर त्याच्याच नामस्मरणात तल्लीन झालेला बाल वारकरी म्हणजे त्याचेच प्रती विठ्ठलच म्हणावा असाच आहे.

असाच अऩुभव पालखी सोहळ्यात येतो. पालकीत चालताना पायांना थकवा नसतोच. शरीरही थकत नाही मनही दमत नाही. तेथे असते ती केवळ आंतरिक ओढ तीही विठुरायाच्या दर्शनाचीच




त. त्या खेळाच्या रूपात ते भक्तीतही न्हाऊन निघतात.




अशीच अनुभूती देणारा पालखी सोहळा. अन् रिंगण सोहळा म्हणजे त्या सोहळ्यातील प्राण. वारकऱ्यांना ताकद देणारा क्षण. रिंगण सोहळा रंगला याच रिंगण सोहळ्यात भागवती पताका घेऊन धावणारे अबालवृद्ध वारकरी.

उभा पंढरी..तो पहा विटेवरी…. अशीच काहीशी भावना मनात गेवून आषाढीच्या दिवशी चंद्रभागेत स्नान करण्यासाटी असंख्य गर्दी असते. ती नेत्रदिपक गर्दी म्हणेज सावळ्या विठुरायाच्या ओढीने आलेल्या भक्तांचा जथ्था.

रिंगण सोहळा म्हणजे पालखी सोहळ्याचा प्राण. वारकऱ्यांच्या अंगात बळ देणारा क्षण. या रिंगण सोहळ्यात धावणारे अश्व डोळ्यात साठविण्यासाठी जमलेला जनसमुदाय.
Esakal