UEFA Euro 2020 England vs Denmark : युरो कप स्पर्धेच्या दुसऱ्या सेमीफायलमध्ये इंग्लंडने नवा इतिहास रचला. एक्स्ट्रा टाईमच्या पहिल्या हाफमध्ये कर्णधार हॅरी केननं फ्री किकवर गोल डागत संघाचा फायनलचा मार्ग मोकळा केला. पहिल्यांदाच इंग्लंडने युरो कप स्पर्धेची फायनल गाठली आहे. वेल्बलेच्या घरच्या मैदानावर जेतेपद मिळवून इतिहास रचण्यासाठी त्यांना इटलीला थोपवावे लागणार आहे. डेन्मार्कच्या संघाचा प्रवास संपुष्टात आला तरी त्यांनी यंदाच्या हंगामात दिमाखदार खेळ दाखवला. क्रिस्टियन एरिक्सनच्या अनुपस्थितीत खेळताना संघाने सेमीफायनलपर्यंत धडक मारत आपल्यातील क्षमता सिद्ध केली. एवढेच नाही तर ज्या इंग्लंडने एकही गोल खाल्ला नाही त्यांच्या विरुद्ध गोल डागत प्रबळ दावेदारांना त्यांनी बॅकफूटवर ढकलले होते. (UEFA Euro 2020 England vs Denmark semifinal Kane penalty helps England beat Denmark 2-1 and enter final Against Italy)

सेमीफायनलमध्ये पहिल्या हाफमध्येच डेन्मार्कने 1-0 अशी आघाडी घेतली होती. पण ही आघाडी कायम ठेवण्यात त्यांना अपयश आले. अवघ्या नवव्या मिनिटानंतर इंग्लंडने सामन्यात बरोबरी केली. विशेष म्हणजे डेन्मार्कच्या स्वंय गोलमुळे त्यांना आघाडी मिळाली. त्यानंतर 1-1 बरोबरीतील सामना एक्स्ट्रा टाईममध्ये गेला. यावेळी एक चॅलेंज डेन्मार्कला चांगलेच महागात पडले. ज्या चॅलेंजवर फ्री किक मिळाली त्यावरच हॅरी केननं गोल डागला. आणि इंग्लंडनं इतिहास रचला. युरोच्या इतिहासात पहिल्यांदाच त्यांनी फायलनध्ये प्रवेश केला.
Esakal