रत्नागिरी – राज्यात वीज मागणीने काल ( ता. 19) उच्चांक गाठला. महावितरण कंपनीने 21 हजार 570 मेगावॅट विजेची मागणी यशस्वीपणे पूर्ण केली. ही वीज मागणी आजपर्यंत नोंद झालेल्या कमाल वीज मागणीपेक्षा 825 मेगावॅटने जास्त आहे. यापूर्वी 23 ऑक्टोबर 2018 ला 20 हजार 745 मेगावॅट एवढ्या कमाल वीजमागणीची नोंद झाली होती. ही मागणी मागील वर्षाच्या फेब्रुवारीच्या कमाल मागणीच्या तुलनेत जवळपास 3 हजार 320 मेगावॅट (18 टक्के) इतकी जास्त आहे.
वातावरणातील बदलामुळे व कृषि पंपासाठी लागणाऱ्या विजेच्या एकूण मागणीत वाढ झालेली आहे. महावितरणने दीर्घकालीन वीजखरेदी करार असलेल्या महानिर्मितीकडून 7 हजार 853 मेगावॅट, एनटीपीसी व एनपीसीआयएल कंपनीकडून एकूण 4 हजार 134 मेगावॅट, तसेच खाजगी प्रकल्प जसे अदानी पॉवर, रतन इंडिया, सीजीपीएल, जेएसडब्लयु, एम्को इत्यादीकडून एकूण 4 हजार 567 मेगावॅट वीज उपलब्ध झाली आहे. नवीन ऊर्जेच्या स्त्रोतापैकी सौर ऊर्जा- 1,864 मेगावॅट , पवन ऊर्जा – 156 मेगावॅट व सहवीजनिमिर्ती प्रकल्पांमधून – 912 मेगावॅट असे एकूण 2 हजार 932 मेगावॅट वीज उपलब्ध झाली आहे. उर्वरित विजेची मागणी ही इंडियन एनर्जी एक्सचेंजमधून 575 मेगावॅट वीज खरेदी करून आणि 950 मेगावॅट कोयना जल विद्युत प्रकल्पातून वीजनिर्मिती करुन पूर्ण केली आहे.
प्रमुख संच बंद तरीही मागणी पूर्ण
विशेष म्हणजे मेरीट ऑडर डिस्पॅचनुसार जास्त वीज दर असलेले मे. रतन इंडिया – 1080 मे.वॅ., महानिर्मिती – 630 मे.वॅ., एनटिपीसी (सोलापूर) – 640 मे. वॅ. असे एकूण 2 हजार 350 मे. वॅ. क्षमतेचे संच हे बंद केलेले आहेत. तरी ही मागणी पूर्ण केली आहे. अशाप्रकारे महावितरणने वातावरणामधील बदल व कृषिपंपाचा वापर यामुळे अचानक वाढलेली विजेची मागणी ही उपलब्ध सर्व स्त्रोतांचा प्रभावीपणे वापर करुन वीजग्राहकांना अखंडित वीजपुरवठा केला आहे. तसेच मार्च व एप्रिल या महिन्यातील अपेक्षित विजेची मागणी लक्षात घेता महावितरणने ही वीज मागणी पूर्ण करण्यासाठी तयारी केली आहे.

News Story Feeds