सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) – रूग्णाचे प्राण वाचवणे महत्वाचे समजून खाजगी रूग्णवाहिका चालकाने स्वतःच जीव धोक्यात असतानाही रुग्णाला हॉस्पिटलमध्ये पोहचविले; मात्र घाईगडबडीत त्याने पाणी म्हणून चुकून पेट्रोल पिला.
अशातच त्याने प्रथम रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेले व त्यानंतर येऊन उपचारासाठी येथील कुटीर रुग्णालयात दाखल झाला. हा प्रकार आज पहाटे साडे पाचच्या सुमारास घडला. हेमंत वागळे (वय 25, रा. इन्सुली), असे या युवकाचे नाव आहे. त्याच्यावर येथील कुटीर रुग्णालयात उपचार करण्यात आले. हेमंत हा युवक येथील एका खाजगी रुग्णवाहिकेवर चालक म्हणून कामाला आहे; मात्र रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला सहकार्य करणे हे तो आद्य कर्तव्य समजतो.
येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना नेहमीच त्याचे सहकार्य लागते. रुग्णाला आपल्या रुग्णवाहिकेतून तात्काळ बांबुळी रुग्णालयात पोचवीत असताना घाईगडबडीत बाजूला असलेले पेट्रोल त्याने पाणी समजून प्राशन केले; मात्र तशाच परिस्थितीत त्याने रुग्णाला रुग्णालयात पोचविले व नंतर येथील उपजिल्हा रुग्णालयात स्वतःवर उपचार करून घेतले. उपचार घेण्यास उशिर झाल्याने घशाला गंभीर दुखापत झाली आहे.

News Story Feeds