बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खानने Aamir Khan पत्नी किरण रावसोबत Kiran Rao घटस्फोट घेत असल्याचं जाहीर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. १५ वर्षांच्या संसारानंतर आमिर-किरणने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मात्र या घटस्फोटाच्या वृत्तानंतर सोशल मीडियावर अभिनेत्री फातिमा सना शेखची Fatima Sana Shaikh जोरदार चर्चा होऊ लागली. फातिमामुळे आमिरने घटस्फोट घेतला, असं म्हणत तिला ट्रोल करण्यात आलं. इतकंच नव्हे तर फातिमाच्या सोशल मीडियावरील पोस्टवरही तिला नकारात्मक कमेंट्स येऊ लागल्या. ‘दंगल’ Dangal या चित्रपटात फातिमाने आमिरच्या मुलीची भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर ती आमिरच्या ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ या चित्रपटातही झळकली. इथूनच दोघांच्या अफेअर्सच्या चर्चांना सुरुवात झाली. (dangal girl fatima sana shaikh fans advised her to close comment section after aamir khan divorce announcement)

‘दंगल’ आणि ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ या दोन्ही चित्रपटांनंतर फातिमा-आमिरमध्ये जवळीक वाढल्याची चर्चा होती. मात्र फातिमाने वेळोवेळी अफेअरच्या चर्चा नाकारल्या होत्या. आता आमिरच्या घटस्फोटानंतर आता पुन्हा एकदा फातिमाची सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली आहे. फातिमाच्या सोशल मीडियावरील नकारात्मक कमेंट्स पाहून काही चाहत्यांनी तिला कमेंट सेक्शन बंद करण्याचा सल्ला दिला आहे. यात अनेकांनी फातिमाची बाजू घेतली. ‘फातिमाला जबाबदार ठरवणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, अशी कमेंट एका चाहत्याने केली. तर आमिरच्या घटस्फोटानंतर फातिमाला का ट्रोल करत आहात, असा सवाल दुसऱ्याने केला. या सर्व प्रकरणावर फातिमाने अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

Also Read: आमिर खान-किरण रावचा घटस्फोट; १५ वर्षांच्या संसारानंतर विभक्त

Also Read: किरण रावच्या आधी रिनाच्या प्रेमात वेडा होता आमिर; रक्ताने लिहिलं होतं प्रेमपत्र

घटस्फोटाविषयी काय म्हणाले आमिर-किरण?

‘विभक्त होण्याची प्रक्रिया काही दिवसांपूर्वीच सुरू झाली होती आणि आता आम्ही दोघं वेगवेगळे राहत आहोत. मुलगा आझादचं संगोपन आम्ही दोघं मिळून करणार आहोत. त्याचप्रमाणे आम्ही चित्रपट, पानी फाऊंडेशन आणि इतर प्रोजेक्ट्सवर सोबत काम करणार आहोत. कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींचे खूप आभार, कारण त्यांनी या निर्णयात आमची साथ दिली आणि आम्हाला समजून घेतलं. आमच्या हितचिंतकांनीही शुभेच्छा आणि आशीर्वाद आम्हाला द्याव्यात. घटस्फोट म्हणजे शेवट नसून एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे’, असं स्पष्ट केलं.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here