ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी बुधवारी सकाळी जगाचा निरोप घेतला. ते ९८ वर्षांचे होते. दिलीप कुमार यांच्या निधनाने सबंध चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली.

दिलीप कुमार यांच्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या, त्यांच्या प्रत्येक सुखदु:खात सावलीप्रमाणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या त्यांच्या पत्नी सायरा बानो यांच्यावर दु:खाचा डोंगरच कोसळला.
चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज दिलीप कुमार यांच्या अंत्यदर्शनाला पोहोचले होते.
दिलीप कुमार यांना अखेरचा निरोप देण्यापूर्वी सायरा बानो त्यांना बिलगून रडल्या.
दिलीप कुमार आणि सायरा बानो यांची जोडी चाहत्यांसाठीही सर्वांत लोकप्रिय आहे.
दिलीप कुमार यांच्या निधनाने सायरा बानो खूप खचल्या होत्या.
साश्रू नयनांनी दिलीप कुमार यांना शेवटचा निरोप दिला.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here