पाली : रोहा तालुक्यातील पिंगळसई येथे एका कुत्र्याच्या मानेच्या भागात मागील 2-3 महिन्यांपासून प्लास्टिक बरणी अडकली होती. या बरणीमुळे कुत्रा प्रचंड त्रस्त झाला होता. मात्र रोहा येथील प्राणीमित्र कुमार देशपांडे व त्यांच्या टीमने गुरुवारी (ता.8) अथक परिश्रमाने या कुत्र्यांच्या गळ्यातील बरणी काढून त्याची सुटका केली.

कुमार देशपांडे आणि दिनेश शिर्के, परेश खांडेकर आदी सहकारी गावात गेल्यावर त्यांनी या कुत्र्याला संपूर्ण गाव फिरून शोधले. त्यानंतर कुमार देशपांडे यांच्या अनेक वर्षाच्या अनुभवामुळे पहिल्याच प्रयत्नात कुत्र्याला पकडण्यात यश आले.

कुत्र्यांच्या गळ्यात अडकलेली बरणी कापून कुत्र्याला त्यापासून मुक्त करण्यात आले. त्यानंतर या कुत्र्याने आनंदाने मोकळा श्वास घेऊन तेथून पळ काढला.

Esakal