फिनलँडचं नाव तुम्ही ऐकलंच असेल! हा एक अतिशय सुंदर देश आहे, जो उत्तर युरोपमधील फेनोस्केनेडियन प्रदेशात आहे.

फिनलँडचं (Finland) नाव तुम्ही ऐकलंच असेल! हा एक अतिशय सुंदर देश आहे, जो उत्तर युरोपमधील (Northern Europe Finland) फेनोस्केनेडियन (Fennoscandian) प्रदेशात आहे. या देशाला ‘तलावांचा देश’ म्हणूनही ओळखलं जातं. याचं कारण असं, की येथे एक लाख 87 हजाराहून अधिक तलाव आहेत, जे फिनलँडच्या सौंदर्यात भर घालतात. या व्यतिरिक्त फिनलँडशी संबंधित इतरही अनेक रंजक गोष्टी आहेत, त्या आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊ..
फिनलँडमधील हवामान खूपच सुंदर आणि आनंददायी आहे. उन्हाळ्याच्या दिवसात येथे रात्री दहा वाजता जणू सायंकाळच झाली असल्याचा भास होतो, तर हिवाळ्यात बहुधा येथे अंधारच पहायला मिळतो. त्यामुळे दुपारनंतरच काही वेळा सूर्याचं दर्शन होतं, तेही कधी-कधीच!
फिनलँडमध्ये ‘टोर्नियो’ (Tornio) नावाचं एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण गोल्फ मैदान (Golf course) आहे. या मैदानाचा निम्मा भाग फिनलँडमध्ये, तर अर्धा भाग स्वीडनमध्ये आहे. या गोल्फ कोर्सला एकूण 18 होल आहेत, त्यापैकी नऊ फिनलँडमध्ये आणि उर्वरित नऊ स्वीडनमध्ये आहेत. येथे लोक खेळत असताना अनेकदा एका देशातून दुसर्‍या देशात पोहोचलेले पहायला मिळतील.
आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, या देशात बायकांना पाठीवर घेऊन धावण्याची जागतिक स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेत जो विजेता ठरेल, त्याला त्याच्या पत्नीच्या वजना इतकी बिअर पुरस्कार म्हणून दिली जाते. ही कदाचित, संपूर्ण जगातील सर्वात अनोखी स्पर्धा आहे.
फिनलँडमध्ये एक अनोखा कायदा देखील आहे, जो नागरिकांच्या पगारानुसार ट्राफिक दंड आकारतो. दरम्यान, लोकांनी या कायद्याचा गैरफायदा देखील घेतला आहे. कारण, लोक जाणीवपूर्वक पोलिसांना पगार कमी असल्याचे सांगून दंड कमी करण्याचा प्रयत्न करतात.
मोबाईल बनवणारी नोकिया कंपनी (Nokia Company) आणि जगाला अ‍ॅंग्री बर्ड्स देणारी रेविओ कंपनी फिनलँडची आहे. इतकेच नाही, तर या फिनलँडने जगाला पहिले इंटरनेट ब्राउझरसुध्दा दिले आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here