मुंबई – आपल्या सौंदर्यानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री म्हणून त्रिधा चौधरीचे नाव घ्यावे लागेल. ती चर्चेत आली ते प्रकाश झा (prakash jha) यांच्या आश्रम (ashram) नावाच्या मालिकेपासून. त्यात तिनं भलतीच बोल्ड भूमिका साकारली होती. या मालिकेनं त्रिधा लाईमलाईट मध्ये आली. यापूर्वी तिनं काही छोट्या मोठ्या भूमिका केल्या आहेत. पण बॉबी देओलसोबत आश्रममधील तिच्या भूमिकेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. (tridha choudhury of pawan singh song babuni tere rang mein bikini photos viral instagram bhojpuri south ashas)

त्रिधा ही मुळची साऊथ इंडियन अभिनेत्री आहे. ती आता चर्चेत आली आहे ते तिच्या बिकीनी फोटोमुळे. सोशल मीडियावर ती नेहमीच अॅक्टिव्ह असते.
त्रिधाच्या बिकीनी फोटोंनी सध्या सोशल मीडियावर चांगलीच हवा तयार केली आहे. त्यामुळे काही काळ का होईना त्रिधाच्या नावाची चर्चा सुरु झालीय. तिनं यापूर्वी देखील आपल्या फोटोशुटमुळे चाहत्यांची वाहवा मिळवली होती.
बंगाली आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये त्रिधानं भूमिका केल्या आहेत. त्यात तिला यशही मिळाले आहे. त्यामुळे कमी वयात तिनं मोठं यश संपाजन केलं आहे.
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असणाऱ्या त्रिधाच्या फॉलोअर्सची संख्या 1.9 लाखांपेक्षा अधिक आहे. यावरुन तिची लोकप्रियता कळून येते.
त्रिधा आपल्या फॅन्सला कधीही नाराज करत नाही. तिनं आपल्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित गोष्टीही शेयर केल्या आहेत. तिच्या बिकिनी फोटोंना चाहत्यांची पसंती मिळाली आहे. त्यापैकी एका फोटोला तिनं कॅप्शन दिलं आहे की, ईझी, ब्रीजी आणि जॅपनीजी. हा फोटो साऊथ मियामीतला आहे.
बिकीनीचे फोटो पहिल्यांदाच तिनं शेयर केलेले नाही. यापूर्वी देखील तिनं अशाप्रकारचे फोटो चाहत्यांसाठी शेयर केले आहेत. गेल्या दिवसांत तिनं ब्लॅक बिकिनी फोटो पोस्ट केले होते. त्याला मोठ्या प्रमाणावर पसंती मिळाली होती.
त्रिधानं सृजित मुखर्जी दिग्दर्शित एका बंगाली चित्रपटाच्या माध्यमातून सुरुवात केली होती. त्या चित्रपटाचे नाव मिश्वर रावोशोयो असे होते. हा चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here