पुणे : ब्रेकफास्ट मध्ये तुम्हाला पुरी, कचोरी किंवा पराठा मिळाला तर मजा येते. जर त्यात मसालेदार बटाटा करी किंवा मसालेदार टोमॅटो चटणी असेल तर ते सोने पर सुहागाच. टोमॅटोची आंबट-गोड चटणी आरोग्यासाठीही चांगली असते. ही चटणी खूप चवदार लागते. ही चटणी खायलाच चांगली नाही तर बनवण्यासही सोपी आहे.

Also Read: स्वादिष्ट, चटकदार ‘या’ 10 प्रकारच्या चटणी तुमच्या ब्रेकफास्टची वाढवतील शान

साहित्य:

टोमॅटो – 1 किलो

गूळ – 250 ग्रॅम

बडीशेप – 1 टीस्पून

तेल – 1 टेस्पून

हळद – चिमूटभर

लाल तिखट – १ टिस्पून

व्हिनेगर – टीस्पून

चाट मसाला – टीस्पून

मीठ – चवीनुसार

काळी मिरी – चवीनुसार

Also Read: साऊथ इंडियन स्पेशल वांग्याची चटणी; नक्की ट्राय करा

कृती:

-सुरवातीला तुम्हाला टोमॅटो पाण्याने स्वच्छ करावे लागतील आणि नंतर ते बारीक चिरून घ्या.

– आता एक कढई घ्या आणि तेल गरम करा.

– तेल गरम झाल्यावर त्यात बडीशेप किंवा जिरे देखील वापरू शकता.

– यानंतर, पॅनमध्ये चिरलेला टोमॅटो घाला. टोमॅटो थोडावेळ पॅनमध्ये ठेवा आणि नंतर त्यात हळद, लाल तिखट, चाट मसाला, मीठ आणि मिरपूड घाला. हे मिश्रण चांगले शिजू द्या.

– त्यानंतर गूळ घाला. तुम्ही गुळाबरोबर थोडेसे पाणी घालू शकता, ज्यामुळे गुळ लवकर वितळण्यास सुरवात होईल.

– गूळ वितळला की चटणी घट्ट होईल आणि पाणी कमी होईल. असे झाल्यावर चटणीमध्ये व्हिनेगर घाला. त्यानंतर आणखी काही वेळ शिजवा.

– चटणी शिजल्यावर कोथिंबीरने सजावट करू शकता.

– तयार टोमॅटो चटणी गरम गरम पराठा किंवा पुरी बरोबर सर्व्ह करा.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here