कऱ्हाड (सातारा) : कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या वाढली आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत आहे, तो लॉकडाउन (Coronavirus lockdown) पुढील आदेश येईपर्यंत कायम राहील. त्याची कडक अंमलबजावणी करावी. आरोग्य विभागाने (Department of Health) गांभीर्याने लक्ष देऊन काम करावे. तातडीने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवून ज्या गावात किंवा संबंधित भागात अधिक बाधित रुग्ण आढळत आहेत, अशा ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) यांनी येथे दिल्या. (Satara Lockdown Corona 2021 District Collector Shekhar Singh Said That Strict Lockdown Will Continue In Satara)

कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत आहे, तो लॉकडाउन पुढील आदेश येईपर्यंत कायम राहील.

कऱ्हाड तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचा आढावा घेऊन पुढील उपायोजनांसदर्भात आयोजित आरोग्यसह सर्वच विभागांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन पाटील, प्रांताधिकारी उत्तम दिघे, पोलिस उपअधीक्षक रणजित पाटील, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, तालुका पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील कोरबू, पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, मलकापूरचे मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे डॉक्टर यांच्यासह खातेप्रमुख उपस्थित होते. आरोग्य विभागाने आढावा दिला.

Also Read: ‘कृष्णा’च्या शिरपेचात मानाचा तुरा

Collector Shekhar Singh

त्यादरम्यान जिल्हाधिकारी सिंह यांनी आरोग्य विभागाच्या कामकाजातील सुधारणांबाबत सूचना केल्या. बाधितांच्या सहवासातील रुग्णांचा शोध व टेस्टिंग वाढवणे, ज्या गावात किंवा संबंधित भागात अधिक बाधित रुग्ण आढळत आहेत, अशा ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र करणे, विलगीकरण कक्ष सुरू करणे आदींबाबत त्यांनी सूचना दिल्या. सध्या कोरोनामुळे जिल्ह्यात कडक लॉकडाउन करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी कडकपणे करावी, आदेश देऊन जे कोरोना नियम व आदेश लागू केले आहेत, त्याबाबत सर्वच प्रशासकीय विभागाने त्याबाबत गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यकता भासल्यास कारवाई करावी, असेही आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

Satara Lockdown Corona 2021 District Collector Shekhar Singh Said That Strict Lockdown Will Continue In Satara

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here