नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आज झालेल्या १०८ व्या दीक्षांत (nagpur university 108 convocation) समारोह पार पडला. यावेळी राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी (governor koshyari) यांच्या उपस्थितीत सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश न्या. शरद अरविंद बोबडे (former CJI Shard Bobade) यांना मानवविद्या शाखेतील ‘विधी पंडित’ (doctor of law) ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. (former cji sharad bobade conferred with doctor of law by nagpur university)
Also Read: कलिंगडाच्या बिया फेकू नका, घरांच्या भेगा बुजविण्यासाठी होणार वापर


ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या समारोहात न्या. शरद बोबडे यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव श्रीनिवास शरद बोबडे यांनी मानद पदवीचा स्वीकार केला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास शिरपूरकर यांचे दीक्षांत भाषण झाले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुभाष चौधरी, प्रकुलगुरू डॉ संजय दुधे व कुलसचिव डॉ राजू हिवसे प्रामुख्याने उपस्थित होते.
राज्यपालांच्या उपस्थितीत ७७९१२ स्नातकांना पदवी व पदवी प्रमाणपत्रे तसेच सुवर्ण व रौप्य पदके प्रदान करण्यात आली. दोन उमेदवारांना मानव विज्ञान पंडित (डी.लिट.) ही पदवी तसेच ८६७ स्नातकांना आचार्य (पीएच.डी.) पदवी देण्यात आली.
Esakal