सातारा : पंढरपूर येथील पायी वारीत (pandharpur ashadhi wari) सहभागी होण्यासाठी निघालेल्या ह.भ.प. बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांची पोलिसांच्या स्थानबध्दतेतून सुटका करावी, यासाठी आज कोरेगावचे आमदार महेश शिंदे (MLA Mahesh Shinde) यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुन्हा एकदा भजन आंदोलन करण्यात आले. या मागणीबाबतचे निवेदन आमदार शिंदे यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) यांना दिले असून यात बंडातात्यांची स्थानबध्दतेतून सुटका न केल्यास आगामी काळात वारकर्यांसह तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. (Pandharpur Ashadhi Wari 2021 MLA Mahesh Shinde Agitation For The Release Of Bandatatya Karadkar In Satara)
पायी वारीत सहभागी होण्यासाठी निघालेल्या बंडातात्या यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यानंतर त्यांना कर्हाड येथे आणत करवडी येथील गोपालन केंद्रात स्थानबध्द करण्यात आले.
पायी वारीत सहभागी होण्यासाठी निघालेल्या बंडातात्या यांना पुणे पोलिसांनी (Pune Police) ताब्यात घेतले होते. यानंतर त्यांना कर्हाड येथे आणत करवडी येथील गोपालन केंद्रात (Gopalan Center Karwadi) स्थानबध्द करण्यात आले. या गोपालन केंद्राला पोलिसांनी वेढा दिला असून आतमध्ये जाण्यास इतरांना मनाई करण्यात आली आहे. शासनाच्या या कृतीचा निषेध करण्याचे सत्र गेले दोन दिवस जिल्ह्याच्या विविध भागात सुरु आहे. शुक्रवारी शासनाच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी कोरेगावचे आमदार महेश शिंदे, ह.भ.प. धनश्याम नांदगावकर यांच्या नेत्तृत्वाखाली आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशार्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सातार्यात येणारे रस्ते रोखून धरले होते.
Also Read: महाराष्ट्र आणि देशातील वारकऱ्यांसाठी; आठवणीतील वारी

तपासणीशिवाय कोणत्याही वाहनांना सातार्यात प्रवेश देण्यात येत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. कर्हाड येथून येणार्या वारकर्यांना त्याचठिकाणी पोलिसांनी स्थानबध्द केल्याचे समजल्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास महेश शिंदे हे वारकर्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजर झाले. याठिकाणी भजन आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचा निषेध करण्यात आला. आंदोलन सुरु असतानाच बंडातात्या कराडकर यांची स्थानबध्दतेतून सुटका करावी, अशी मागणी करणारे निवेदन आमदार शिंदे, धनश्याममहाराज नांदगावकर व इतरांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना दिले. या निवेदनात मागणी मान्य न केल्यास आगामी काळात वारकर्यांसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
Pandharpur Ashadhi Wari 2021 MLA Mahesh Shinde Agitation For The Release Of Bandatatya Karadkar In Satara
Esakal