वडूज (सातारा) : खटाव-माण तालुक्यातील काँग्रेस (National Congress Party) कार्यकर्त्यांना पक्षाच्या माध्यमातून ताकद देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे मत हरणाई सूतगिरणीचे संस्थापक, राष्ट्रीय काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख (Congress leader Ranjitsingh Deshmukh) यांनी व्यक्त केले. येथील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मोहनराव देशमुख, खटाव-माण विधानसभा मतदार संघाचे (Khatav-Maan Assembly constituency) अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष डॉ. महेश गुरव, बाबासाहेब माने, खादी ग्रामोद्योगचे अध्यक्ष परेश जाधव, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष विजय शिंदे, डॉ. संतोष गोडसे, शंकरराव माळी, संजय साळुंखे, दाऊद मुल्ला, पोपट मोरे, सत्यवान कांबळे, डॉ. बाळासाहेब झेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. (Ranjitsingh Deshmukh Promises To Give Strength To Congress Party In Khatav-Maan Taluka Satara Political News)

खटाव-माण तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना पक्षाच्या माध्यमातून ताकद देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे मत काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख यांनी व्यक्त केले.

देशमुख पुढे म्हणाले, राज्यातील विधानसभा मतदार संघात फेरबदल झाले आहेत. अशा परिस्थितीत खटाव-माण विधानसभा मतदार संघ विस्तृत आहे, त्यामुळे या विधानसभा मतदार संघासाठी अध्यक्ष असणे गरजेचे असल्याची बाब माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan), प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आदी वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळी श्रेष्ठींनी देखील आपल्या मागणीचा विचार करून त्यास तातडीने संमती दिली. त्यानुसार डॉ. गुरव, श्री. माने यांच्यासारख्या अनुभवी व उमद्या कार्यकर्त्यांना संधी दिली. या दोन्ही तालुक्यांत काँग्रेसची ताकद एकसंघ आहे, त्यामुळे आगामी काळात ती आणखी मजबूत केली जाणार आहे. पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना ताकद दिली जाईल.

Also Read: चुकीच्या नेतृत्वाची किंमत देश मोजतोय

National Congress Party

डॉ. गुरव म्हणाले, रणजितसिंह देशमुख यांनी दोन्ही तालुक्यांतील पदनिर्मितीच्या मांडलेल्या प्रस्तावाला श्रेष्ठींनी तातडीने संमती दिली. यातच त्यांची पक्षातील ताकद दिसून येते. खटाव-माण तालुक्यात काँग्रेसचा विचार मानणारी जनता आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी चुकून उदयास आलेले एक नेतृत्व घरी बसविण्याचा निर्धार यापुढील काळात केला जाणार आहे. यावेळी डॉ. गुरव, श्री. माने यांची निवड झाल्याबद्दल, तसेच राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत धवल यश मिळविल्याबद्दल सिद्धांत चिंचकर, आशुतोष शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. ॲड. संतोष भोसले यांनी प्रास्ताविक केले. विजय शिंदे यांनी स्वागत, तर सचिन घाडगे यांनी आभार मानले.

Ranjitsingh Deshmukh Promises To Give Strength To Congress Party In Khatav-Maan Taluka Satara Political News

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here