नागपूर : काही वर्षांपर्यंत कॉफीला (coffee) हायक्लास ड्रिंक म्हटले जायचे. परंतु, आता कॉफी घराघरांमध्ये पोहोचलेली आहे. कॉफी आपल्यापैकी अनेकांना प्यायला आवडते. यामुळे थकवा दूर होतो. झोप येत असल्यास कॉफी पिली जाते. बऱ्याच जणांना कॉफी प्यायल्यानंतर व्यवस्थित जाग आल्यासारखी वाटते. दिवसातून दोन कप ब्लॅक कॉफी प्यायल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करून वजन कमी करण्यासाठी फायदा होतो. मात्र, कॉफी पिण्याचे कोणते फायदे आणि नुकसान (advantages and disadvantages) आहेत हे अनेकांना माहिती नाही. चला तर आज जाणून घेऊया… (These-are-the-advantages-and-disadvantages-of-drinking-coffee)

कॉफी पिल्याने डोळ्यांखालील गडद मंडळे कमी होतात.
कॉफीमुळे एखाद्याचा मनःस्थिती लवकर बदलते. नैराश्य किंवा नैराश्याची समस्या कमी होऊ शकते.
कॉफीच्या अधिक सेवनामुळे सारखी लघवीला लागते. त्यामुळे शरीरातील कॅल्शिअम कमी होऊ लागते. परिणामी हाडांचे आरोग्य बिघडते. दिवसभरात दोन कप पेक्षा अधिक कॉफी पिऊ नका.
मधुमेह टाइप दोनच्या रुग्णांनी दिवसातून दोनदा साखरेशिवाय कॉफी पिल्यास ५० टक्क्यांपर्यंत साखरेची पातळी कमी होऊ शकते.
बाळासाठी प्लॅनिंग करत असाल तर कॉफीपासून दूर रहा. कॉफीमुळे रक्त वाहिन्या आकुंचित पावतात. त्यामुळे रक्तप्रवाह नीट होत नाही. परिणामी गर्भातील बाळावर परिणाम होऊ शकतो.
कॉफीमध्ये उपस्थित मॅग्नेशिअम, पोटॅशिअम चरबी कमी करते. चरबी कमी केल्याने शरीराचे वजन वाढत नाही आणि लठ्ठपणा कमी होतो.
कॉफीच्या अत्याधिक सेवनाचा परिणाम स्पर्म काऊंटवर होतो.
कामामुळे येणारा कंटाळा दूर करण्यासाठी कॉपी एक चांगला पर्याय आहे. कॉफी पिल्याने शरीराला ऊर्जा मिळते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here