राष्ट्रीय पुरस्कार विजेती मराठमोळी अभिनेत्री प्रतिष्ठित ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ला पोहोचली आहे.
उषाने सोशल मीडियावर कान्सच्या ओपनिंग सेरेमनीचे काही फोटो पोस्ट केले आहेत. गेल्या वर्षी शूटिंगनिमित्त उषा स्पेनला गेली होती. दिग्दर्शक अलेजान्ड्रो कोर्टेसच्या चित्रपटात ती भूमिका साकारतेय. दिग्दर्शक अलेजान्ड्रोसोबतच ती या फेस्टिव्हलला पोहोचली. यावेळी उषाने आकाशी रंगाचा गाऊन परिधान केला असून तिथल्या समुद्रकिनारी सुंदर फोटोशूट केले आहे. उषाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होतोय.