पुणे : रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे टर्मरिक लाते आणि गोल्डन मिल्क ही दोन उत्पादने ‘कुतवळ फूड्स’ने बाजारात आणली आहेत. महाराष्ट्राचे पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याहस्ते आज ‘कुतवळ फूड्स’च्या दोन उत्पादनांचं अनावरण करण्यात आलं. यावेळी ‘कुतवळ फूड्स’चे चेअरमन प्रकाश कुतवळ, मॅनेजिंग डायरेक्टर रामदास कुतवळ आणि डायरेक्टर सुवर्णा कुतवळ हे देखील उपस्थित होते. हा कार्यक्रम ‘सकाळ’च्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पार पडला. यावेळी पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक दत्तात्रय धनकवडे देखील उपस्थित होते.

Also Read: मुंबईच्या ‘लॉकडाउन’संबंधी पालकमंत्र्यांचे सूचक विधान

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सदिच्छापर मनोगतात म्हटलं की, या राज्याचा राज्यमंत्री या नात्याने मी कुतवळ फूड्सचे आभार मानतो. इतर अनेक डेअरी व्यावसायिक दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करतात मात्र, कुतवळ फूड्सने नाविन्यपूर्ण पद्धतीने आरोग्यास हितकारक अशी दोन उत्पादने सुरु केली आहेत, त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो. गोल्डन मिल्क आणि टर्मरिक लाते या दोन्ही उत्पादनांच्या हळद आणि दूध या कच्च्या मालासाठी शेतकऱ्यांनाही फायदा होणार आहे. आणि आरोग्यास हितकारक असल्याकारणाने त्याचा सामान्य नागरिकांनाही फायदा होणार आहे. गुणवत्ता आणि दर्जा चांगला असल्याकारणाने हे दोन नवे प्रोडक्ट्स सुद्धा ग्राहकांना नक्कीच आवडतील, अशी मला खात्री आहे.

Also Read: रेल्वे कर्मचारी आता दोन शिफ्ट्समध्ये करणार काम

हा संपूर्ण कार्यक्रम तुम्ही ‘सकाळ’च्या फेसबुक पेजवर पाहू शकता…

कंपनीचे चेअरमन प्रकाश कुतवळ यांनी 20 वर्षांचा एकूण प्रवास उलगडून सांगताना म्हटलं की, 21 व्या वर्षात पदार्पण करत असताना दोन नवे प्रोडक्ट्स लाँच करताना मला आनंद होतोय. दुग्धजन्य उत्पादनांच्या निर्मितीपासून सुरु झालेला हा प्रवास आजही सुरु आहे. अनेक कंपन्यांसोबत आम्ही सध्या काम करतोय. महाराष्ट्र शासनाचे आरे प्रॉडक्ट्स असेल वा सोळा-सतरा देशांमध्ये निर्यात असेल, कुतवळ फूड्सने तयार केलेली उत्पादने सर्वदूर पोहोचत आहेत. गुणवत्ता आणि दर्जाशी कसलीही तडजोड न करता इथून पुढेही आम्ही अशीच उत्पादने ग्राहकांच्या सेवेसाठी आणण्याचा आमचा मानस आहे.

Also Read: World Corona Update: रुग्णवाढीत ब्राझील आघाडीवर

कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर रामदास कुतवळ यांनी नवीन प्रॉडक्ट्सविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी म्हटलं की, 20 वर्षांत नवनवी उत्पादने बाजारात आणत असताना नेहमीच आमचं असं धोरण राहिलेलं आहे की, भारतीय पारंपारिक उत्पादने आकर्षक पॅकेजिंग, हाताळण्यास, वापरण्यास सोयीची अशा पद्धतीने कल्पकरित्या बाजारात आणायची. कोरोनाच्या या काळात टर्मरिक लाते आणि गोल्डन मिल्क ही दोन नवी उत्पादने सगळीकडे उपलब्ध असतील, ती ऑनलाईन देखील लवकरच उपलब्ध होणार आहेत. या उत्पादनांच्या रुपाने ‘उर्जा’ हा ब्रँड भारतभर पोहोचवण्याचा आमचा मानस आहे. ग्राहक त्यांना चांगला प्रतिसाद देतील, अशी मला आशा आहे.

Also Read: ‘द काश्मीर फाइल्स’च्या लाइन प्रोड्युसरची आत्महत्या; अनुपम खेर हळहळले

यावेळी कंपनीच्या डायरेक्टर सुवर्णा कुतवळ यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत केलं. त्या म्हणाल्या की, कोरोना महासंकटाच्या काळात प्रत्येक जण आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. आरोग्य किती महत्त्वाचं आहे, याचा प्रत्यय आपल्याला या काळात आला आहे. त्यामुळेच आम्ही हे ‘इम्यूनिटी बूस्टर’ ठरणारी दोन उत्पादने घेऊन आलो आहोत. आम्ही समाजाच्या सेवेसाठी सादर करत असलेली ही दोन उत्पादने निश्चितच लोकांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील, असा मला विश्वास आहे. यावेळी पुणे महापालिकेचे नगरसेवक दत्तात्रय धनकवडे देखील उपस्थित होते. त्यांनी म्हटलं की, कुतवळ फूड्सने रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे दोन प्रोडक्ट्सचं अनावरण झालंय. यासाठी मी सदिच्छा व्यक्त करतो.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here