ढेबेवाडी (सातारा) : महिन्यापूर्वीच ‘ओव्हर फ्लो’ झालेले धरण आता रिते झाले आहे. लाभक्षेत्रात सिंचन व्यवस्था नसल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. रिंगरोडसह बांधकामाशी निगडितही काही प्रश्न दुर्लक्षित असल्याने पावसाळ्यातील (Heavy Rain) शेतकऱ्यांची (Dhebewadi Farmer) कसरत सुरूच आहे. प्रत्येक वर्षी आम्ही त्याच अडचणी व तेच प्रश्न मांडतोय मात्र, खरे तर त्यातील किती प्रश्न तुम्ही सोडवले..? याचे उत्तर अगोदर द्या, असा सवाल काळगाव (ता. पाटण) नजीकच्या साखरी धरणामुळे (Sakhari Dam) विविध अडचणींशी सामना करत असलेल्या शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाला (Department of Irrigation) केला आहे. (Sakhari Dam Empty Without Water Due To Lack Of Rain Satara Marathi News)

काळगाव नजीकच्या साखरी धरणात दहा वर्षांपासून पाणी अडविण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात त्याच्या पाण्याचा योग्य फायदा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना झालेला नाही.

काळगाव नजीकच्या साखरी धरणात दहा वर्षांपासून पाणी अडविण्यात येत असले तरी प्रत्यक्षात त्याच्या पाण्याचा योग्य फायदा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना झालेला नाही. लाभक्षेत्रातील बंधाऱ्यांची कामे अपूर्णच आहेत. ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशीच त्या परिसरातील गावांची अवस्था झाली आहे. सांडव्याकडील बांधकामही अजून काही प्रमाणात शिल्लकच आहे. धरणाची पाणी साठवन क्षमता ७५ दशलक्ष घनफुट असून ३१६ हेक्टर क्षेत्र लाभक्षेत्रात समाविष्ट आहे. धरणाच्या बाजूला काळगाव व परिसरातील शेतकऱ्यांची शेती असून सुमारे ५० हेक्टरवर पिकाऊ क्षेत्र आहे. शेतीसह दुधडेवाडीकडे जाण्यासाठी धरणाजवळून रिंगरोड तयार करण्याचे काम मध्यंतरी हाती घेण्यात आले होते, मात्र ते अर्ध्यात रखडल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

Also Read: बंडातात्‍यांची सुटका करा, अन्यथा तीव्र आंदोलन

Heavy Rain

बाजूने संरक्षक भिंत बांधून या रस्त्याला कायमस्वरूपी सुरक्षितता देण्याची शेतकरी व नागरिकांची मागणी आहे. मात्र, त्याऐवजी रस्त्याच्या बाजूने क्रॅश बॅरिअर लावले आहेत. ठिकठिकाणी फरशीपूल नसल्याने पावसाचा जोर वाढल्यावर शिवारात गेलेले शेतकरी तिकडेच अडकून पडल्याचे प्रसंग पावसाळ्यात घडतात. प्रतिवर्षी आम्ही त्याच अडचणी व तेच प्रश्न मांडतोय, मात्र त्यातील किती प्रश्न सोडवले. हे अगोदर सांगावे, अशी विचारणा धरणग्रस्त प्रश्नी सातत्याने पाठपुरावा करत असलेले तेथील शेतकरी सूर्यकांत उर्फ राजू काळे यांनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे. पाटबंधारेच्या कार्यालयात जावून त्यांनी विविध प्रश्नी संबंधितांना जाबही विचारला. लवकरच याप्रश्नी निवेदन सादर करून तीव्र लढ्याचे पाऊल उचलणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Sakhari Dam Empty Without Water Due To Lack Of Rain Satara Marathi News

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here