भारतीय परंपरेनुसार स्वत:चे आरोग्य जपण्यालाठी कित्येक काळापासून ऋषि-मुनी योग साधना करतात. पण, आजच्या काळात फास्ट फूड, आरोग्यास आपायकारक खाण्याच्या पध्दतीचा रोजच्या जीवनशैलीमध्ये समावेश झाल्याने लोकांमध्ये आरोग्याच्या समस्या वाढत आहे. यामध्ये मधूमेह, आणि ह्रद्यविकारांचा समावेश सर्वात जास्त असल्याचे दिसते. त्यामुळे आज जगभरात योगाचे महत्त्व सांगितले जात आहे. पण तुम्हाला माहित आहे का? शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योगा उपयोगी ठरतो तसचा चेहऱ्याच्या सुंदरतेसाठी फेस योगा(Face Yoga) उपयोगी ठरतो. (Do only 5 minutes daily Face Yoga Double Chin will disappear)

फेस योगामुळे चेहाऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या (Wrinkles) कमी होतात आणि तेज कायम राहते. नियमित फेस योगा(Face Yoga) केल्याने नाक, गाल, हनुवटी येथील त्वचा (Skin tighting)ताणली जाते. जस जसे वय वाढत जाते, आपल्या चेहऱ्यावरील तेज हळू हळू कमी होत जाते. फेस योगामुळे ही प्रक्रिया खूप मंदावते (Face Yoga)वाढत्या वयाचा प्रभाव कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो. फेस योगामुळे चेहऱ्यामधील रक्त संचार क्रिया चांगली काम करते. ज्यामुळे चेहाऱ्यांचे स्नायू बळकट होतात आणि जास्तीची चरबी निघून जाते. जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर तेज हवे असेल आणि त्वचा (Skin) तरुण दिसावी असे वाटत असेल तर तुम्ही फेस योगाचा (Face Yoga) रोजच्या रुटीनमध्ये नक्की समावेश करा.

सविस्तर जाणून घेऊ या फेस योगाबाबत

लिप पील (Lips Peel )

लीप पील हा फेस योगामधील एक प्रकार आहे. लीप पील या योगामुळे गालातील स्नायू आणि हनुवटीच्या खालील स्नायू(Jaw Line)साठी फायदेशीर ठरतो. तसेच चेहऱ्यावर तेज आणि तारुण्य टिकविण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. या योग करताना खालचा ओठ जितका शक्य असेल तितका हा बाहेरच्या बाजूला काढावा लागतो. त्यामुळे हनुवटीवर ताण येतो.

जीभ पोज (Tongue Pose)

जीभ पोज योग करताना सर्वात आधी जीभ जितकी शक्य असेल तितकी बाहेर काढू शकता. साधारण ३० सेकंडपर्यंत जीभ तशीच राहू द्या. त्यामुळे चेहऱ्यावरील काळी वर्तुळ कमी होता. नियमित हा योग केल्याने हळू हळू चेहऱ्यावरील सुरकुत्या देखील कमी होतात.

माऊथवॉश टेकनिक योग (Mouthwash Technique)

माऊथवॉश योग सर्वात सोपा आहे. हा योग करताना तोंडात पाणी घेऊन चूळ भरत असल्यासारखा चेहरा केला जातो. येथे पाणी ऐवजी तोंडात हवा भरुन गाल चूळ भरत असल्यासारखे हलवा. ही क्रिया २-३ वेळा केल्याने खूप फायदा होतो. चेहऱ्यावरील जास्तीची चरबी कमी होण्यास मदत होते.

फिश पोज (Fish Pose)

फिश पोज पाऊट करताना जसे ओठांचा आकर करतो तसे करुन गाल ओढून हा योग केला जातो. काही सेंकद साठीच ही क्रिया करावी. तीन वेळा ही क्रिया पुन्हा करावी. हा योग करताना चेहऱ्या आकार माशासारखा दिसतो त्यामुळे याला फिश पोज म्हणतात.

आय फोकस (Eye Focus)

आय फोकस योगा केल्यामुळे तुमच्या भूवया सुधारतात. हा योग करण्यासाठी, डोळे रुंद पसरवा, परंतु भुवया संकुचित होऊ नयेत याची काळजी घ्या. त्यानंतर दुरवर असेल्या वस्तूंवर लक्ष केंद्रीत करा आणि हळूहळू जवळच्या वस्तूंवर लक्ष द्या. फिर दूर रखी चीजों पर ध्यान दें और फिर धीरे धीरे पास की चीजों की ओर ध्यान लगाएं.

फेस योगाचे फायदे

  • फेस योगा केल्याने चेहऱ्यावरील तारुण्य टिकून राहते.

  • फेस योगामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.

  • फेस योगामुळे चेहरा उजळ होतो.

  • फेस योगामुळे डबल चीन देखील कमी होते

  • फेस योगामुळे तुमचा चेहरा अत्यंत आकर्षक बनू शकतो.

  • फेस योगामुळे त्वचेतील ढीलाई (loose skin)कमी होते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here