धायरी : साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने भाजीपाला घेऊन निघालेला ट्रक (क्रमांक: डी डी ०१ सी ०४६७) आज सकाळी नवले पुल व वडगांव पुलाजवळील हॉटेल विश्वास समोर आला असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. शनिवारी सकाळी साडे सातच्या सुमारास नवले पुलाजवळ ही घटना घडली. या अपघातात ८ गाड्यांचा चुराडा झाला असून एकाचा मृत्यू झाल्याचे समजते. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे तसेच सिंहगड वाहतूक विभागाचे पोलीस घटनास्थळी पोहचले असून जखमींची माहिती घेत आहेत. सकाळी झालेल्या या अपघातामुळे बराच वेळ महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.

मुंबई बंगळुरू महामार्गावर एका ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर असणाऱ्या वाहनांना धडक दिली. या विचित्र अपघातात एकूण आठ वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत सिंहगड रस्ता पोलीस घटनास्थळी पोहोचले असून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Also Read: गरवारे कॉलेजपर्यंत मेट्रो २५ जुलै दरम्यान धावणार

साताऱ्याच्या दिशेकडून मुंबईच्या दिशेने  भाजीपाला घेऊन जाणारा ट्रक ( क्रमांक: डी डी ०१ सी ०४६७) आज सकाळी नवले पुल व वडगांव पुलाजवळ हॉटेल विश्वास समोर आलाअसता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे, ट्रकने समोरच असणाऱ्या ४ चारचाकी वाहनांना व ४ रिक्षांना जोरदार धडक दिली.

या अपघातामध्ये काहीजण जखमी झाले आहेत तर, ८ गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर एकाच जागीच मृत्यू झाला आहे. विद्याधर साळुंके (वय-६८) यांचा अपघात मृत्यू झाला आहे.

वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अंकुश कर्चे व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून जखमींची माहिती घेत आहेत. सकाळी झालेल्या या अपघातामुळे बराच वेळ वाहतूक कोंडी झाली आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here