मिस वर्ल्ड ही सर्वात प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धा आहे. ही स्पर्धा सर्वांत आधी 29 जुलै 1951 रोजी एरिक मॉर्ली यांनी युनायटेड किंग्डममध्ये सुरू केली. मिस युनिव्हर्स, मिस अर्थ, मिस इंटरनॅशनल आणि मिस वर्ल्ड या सर्वात मोठ्या सौंदर्यस्पर्धा आहेत. १९६६ ते २०१७ या कालावधीत जगभरात भारताचं नाव उंचावणाऱ्या सहा महिला कोण, ते पाहुयात..

1966 साली रिटा फारिया ही मिस वर्ल्ड होणारी पहिली आशियाई महिला ठरली. मिस वर्ल्ड झाल्यानंतर रिटाला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या. पण त्या सर्वांना नकार देऊन तिने मेडिकलमधील शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.
ऐश्वर्या राय बच्चनने 1994 साली ‘मिस वर्ल्ड’ हा किताब मिळवला. त्यानंतर तिने 1997 मध्ये इरुवर या तमिळ चित्रपटामधून अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केले. ‘और प्यार हो गया’ या चित्रपटामधून तिने बॉलिवूडमध्य़े एन्ट्री केली.
डायना हेडनने 1997 मध्ये ‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकला. डायनाने मिस वर्ल्ड -आशिया आणि ओशनिया, मिस फोटोजेनिक आणि स्पेक्टॅक्यूलर स्विमवेअर हे मिस वर्ल्डचे तीन सब-टाईल्स देखील जिंकले आहेत.
युक्ता मुखी 1999 साली मिस वर्ल्ड झाली. मिस वर्ल्ड-एशिया आणि मिस वर्ल्ड-ओशनिया हे टायटल देखील तिने जिंकले आहेत.
2000 साली प्रियांका चोप्रा मिस वर्ल्ड झाली. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये काम करण्याचे ठरवले. प्रियांका सध्या बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
2017 मध्ये मिस वर्ल्ड झालेली मानुषी छिल्लर लवकरच ‘पृथ्वीराज’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये ती अक्षय कुमारसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here