महिला टेनिस जगतातील नंबर वन खेळाडू असलेल्या अॅश्ली बार्तीने पहिली वहिली विम्बल्डन स्पर्धा जिंकली. कारकिर्दीतील तिचे हे फ्रेंच ओपननंतर दुसरे ग्रँडस्लॅम आहे. बार्ती वयाच्या 15 व्या वर्षांपासून व्यावसायिक टेनिस खेळते. 2011 मध्ये तिने विम्बल्डन स्पर्धेतून पदार्पण केले होते. कॅरोलिना प्लिस्कोवा देखील पहिल्यांदाच फायनलमध्ये खेळत होती. दुसऱ्या सेटमध्ये तिने सामना बरोबरीत आणला. पण चेक प्रजासत्ताकच्या या खेळाडूला गतविजेतेपदावर समाधान मानावे लागले.विम्बल्डन स्पर्धा जिंकणारी ऑस्ट्रेलियाची ती तिसरी महिला खेळाडू ठरली आहे. कॅरोलिना प्लिस्कोवा हिने तिला तगडी फाईट देण्याचा प्रयत्न केला. पण अखेरच्या सेटमध्ये ती कमी पडली. ऑस्ट्रेलियन बार्तीने टेनिसमधून ब्रेक घेत क्रिकेटमध्येही हात आजमावलाय. 2014 मध्ये तिने क्रिकेट खेळण्यासाठी टेनिसमधून ब्रेक घेतला होता. वयाच्या 19 व्या वर्षी तिने क्विन्सलँडमध्ये ट्रेनिंगला सुरुवात केली. ऑस्ट्रेलियातील महिला बिग बॅश लीगमध्ये ब्रिस्बेन हीट संघाने तिला करारबद्ध केले. या संघाकडून तिने 9 सामने खेळले आहेत.बार्ती वयाच्या 15 व्या वर्षांपासून व्यावसायिक टेनिस खेळते. 2011 मध्ये तिने विम्बल्डन स्पर्धेतून पदार्पण केले होते.