नवी दिल्ली – इंधनदरवाढीबरोबरच (Fuel) किराणा सामानाचे दरही (Rate) वाढलेले आहेत. खाद्यतेलाच्या (Food Oil) विशेषत: सूर्यफूल तेलाच्या किमतीत वर्षभरात ६० टक्कयांपेक्षा अधिक वाढ झाली असून गेल्यावर्षी मार्च महिन्यात १०७ रुपयांना मिळणारे सूर्यफुलाचे तेल आता १७२ रुपयांना झाले आहे. याशिवाय दुधाचे दरही सहा टक्क्यांनी वाढले असून गतवर्षी ४६ रुपये लिटरने मिळणारे दूध आता ४९ रुपये लिटरने मिळत आहे. (Inflation Hit the Kitchen Too)

महागाईने सर्वसामान्यांच्या महिन्यांचा हिशेब कोलमडून पडला आहे. एकीकडे वाढणारे इंधनाचे दर आणि दुसरीकडे किराणा सामानाच्या किंमतही लक्षणीय वाढ होताना दिसून येत आहे. प्रामुख्याने खाद्यतेलाच्या किमतीत झालेली लक्षणीय वाढ सामान्यांचा खिसा कापणारी आहे. मध्यंतरी दोनशे रुपयांपर्यंत पोचलेले खाद्यतेल आता १६० ते १७० रुपये लिटर दरावर स्थिरावले आहे. शेंगदाणा तेलाचे दर गतवर्षी १४० रुपये प्रतिलिटर असताना आता तो दर १७९ वर पोचला आहे. वर्षभरात २८.१ टक्के दराने वाढ नोंदली गेली आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here