कऱ्हाड (सातारा) : पाचवी ते दहावीपर्यंतच्या सलग दहावर्षात घट्ट मैत्री झालेल्या सवंगड्यांनी बंडातात्या कऱ्हाडकर (Bandatatya Karadkar) यांची करवडीच्या श्रीकृष्ण गोपालन केंद्रात (Shrikrishna Gopalan Center Karvadi) जावून भेट घेतली. अनेक वर्षानंतर बालपणीचे सवंगडी (Childhood Friends) त्यानिमित्ताने एकत्र आले. शाळेतील (School) मंतरलेल्या दिवसांच्या आठवणीने भारावलेल्या सत्तरीतील या तरुणांनी दर सहा महिन्यांनी एकत्र येण्यासाठी आणि बडातात्यांचा सहवास लाभावा यासाठी सरकारने (maharashtra government) त्यांना दरवर्षी किमान दोन दिवस तरी स्थानबध्द करावेच, असा उपरोधिक ठरावच केला. (Friends Demand The Government To Keep The Bandatatya Karadkar At The Shrikrishna Gopalan Center Once A Year Satara Marathi News)
बंडातात्या कऱ्हाडकर यांनी दिंडी सोहळ्यास परवानगी द्यावी, ही मागणी करुन पायी चालण्यास सुरुवात केली होती. त्याची दखल घेवून पुणे पोलिसांनी त्यांना करवडीच्या गोपालन केंद्रात आणून तेथे स्थानबध्द केले आहे.
बंडातात्या कऱ्हाडकर यांनी दिंडी सोहळ्यास परवानगी द्यावी, ही मागणी करुन पायी (Ashadhi Ekadashi Wari) चालण्यास सुरुवात केली होती. त्याची दखल घेवून पुणे पोलिसांनी तात्यांना करवडीच्या गोपालन केंद्रात आणून तेथे स्थानबध्द केले आहे. त्यामुळे सध्या बंडातात्या चांगलेच चर्चेत आले आहे. दरम्यान, बंडातात्या स्थानबध्द आहेत, याचा फायदा उठवत त्यांच्या बालपणीच्या सवंगड्यांनी त्यांची करवडीतील गोपालन केंद्रात जावून भेट घेतली. त्याबाबत माहिती देताना त्यांचे मित्र चंदू जाधव म्हणाले, बंडातात्या आणि त्यांचे सहकारी 1960 मध्ये शाळा नंबर आठमध्ये पाचवीत शिकत होतो. 1970 मध्ये दहावीचे शिक्षण घेवून सर्वजण बाहेर पडलो. त्यावेळी वर्गात प्रथम क्रमांक येण्यासाठी सलीम मुल्ला, अशोक आदमणे आणि प्रकाश सदाशिव जंत्रे उर्फ बंडातात्या कऱ्हाडकर हेच झटत होते. मजहर कागदी यांच्या डब्यात जेवण करुन त्यांनी शिक्षण घेतले. दहावीतून बाहेर पडल्यानंतर बंडातात्या यांनी यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांना आध्यात्माची गोडी लागल्यावर ते बंडातात्या कऱ्हाडकर झाले.
Also Read: ज्या हातांना पकडलं, त्याच हातांनी पोलिसांना बंडातात्यांनी जेवू घातलं!
एकदा येथील (कै.) बाळू कुंभार हे चारधाम यात्रेला गेल्यावर त्यांना एका मुक्कामात उत्तर प्रदेशातील एका शहरात बंडातात्यांचे किर्तन असल्याचे समजले. त्यावेळी त्यांनी कऱ्हाडला येवून त्यांची ख्याती सांगितली होती. बंडातात्या या पहिल्यापासूनच बंडखोर वृत्तीचे आहेत. बंडातात्या शहरातील जैनुद्दीन भादी, मजहर कागदी, अरुण देसाई, बलराम सचदेव यांच्या संपर्कात होते. प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळेतील मित्रांचा ग्रुप असावा ही कल्पना बंडातात्यांनी पुढे आणली. त्यातून 23 ऑगस्ट 2013 ला बंडातात्या कऱ्हाडकर मित्र मंडळाची स्थापना झाली. पहिल्याच स्नेहमेळाव्याला सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे आदी ठिकाणांहून बंडातात्यांवर प्रेम करणारे 64 विद्यार्थी व सहा गुरुजन माझ्या घरी जमले होते.

50 वर्षांनी एकमेकाला भेटणारे मित्र डोळ्यात आनंदाश्रू घेवून एकमेकांना मिठी मारत होते. त्या स्नेह मेळाव्यात बंडातात्या कऱ्हाडकर मित्र मंडळाला आठ वर्षे पूर्ण होतायत. त्याचे औचित्य साधून तात्यांच्या बालपणीच्या सवंगड्यांनी करवडीतील त्यांना स्थानबध्द केलेल्या गोपालन केंद्रात जावून भेट घेतली. त्यानंतर त्यांचा छोटा स्नेहमेळावाही झाला. आठ वर्षात प्रतिवर्षी किमान दोनदा स्नेहभोजन घ्यायचे ठरले होते. मात्र, कामाच्या व्यापामुळे बंडातात्यांनी अनेकदा दांडी मारली आहे. त्यामुळे वारकरी बंधुंची माफी मागून तात्यांना वर्षातून किमान दोन दिवस तरी आमच्या स्नेहमेळाव्यासाठी स्थानबध्द करावेच आणि तेही करवडीतच अशी विनंती सवंगड्यांनी केली आहे.
Also Read: ‘वारकर्यांची धरपकड करणार्या दंडेलशाही सरकारचा निषेध’
बंडातात्यांनी 35 सवंगड्यांचा स्वतः बनवला स्वयंपाक
करवडीतील गोपालन केंद्रात भेटायला आलेल्या 35 सवंगड्यांना बंडातात्या यांनी स्वतः जेवण करुन घातले. त्यांनी त्यांच्यासाठी भरलेलं वांग, खर्डा, भाकरी हा मेन्यू तयार करुन खाऊ घातला. त्याचबरोबर तातडीने कालेतील एका युवकाला बोलावून स्वयंपाक होईपर्यंत मैदानी खेळाचे प्रात्यक्षिक दाखवून संवगंड्यांना प्रेरणाही दिली.
Friends Demand The Government To Keep The Bandatatya Karadkar At The Shrikrishna Gopalan Center Once A Year Satara Marathi News
Esakal