coronavirus in india, covid-19, latest updates : आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत देशात 41 हजार 506 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. याच कालावधीत देशात 41 हजार 526 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 895 जणांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपासून देशातील कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या कमी-जास्त होत आहे. 35 हजारांखाली आलेली नवीन कोरोना रुग्णसंख्या पुन्हा 45 हजारांच्या पुढे गेली होती. आता यामध्ये पुन्हा एकदा थोड्याप्रमाणात घट पाहायला मिळत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील तीन दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येमध्ये थोड्या प्रमाणात घट पाहायला मिळत आहे.

देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळत आहे. देशाचा सध्याचा रिकव्हरी रेट 97.20 टक्के इतका आहे. भारताचा पॉझिटिव्हिटी रेटही मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. भारताचा आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट 2.32 टक्के इतका आहे. देशाचा सध्याचा आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्केंपेक्षा कमी आहे. सलग विसाव्या दिवशी देशाचा दररोजचा पॉझिटिव्हिटी रेट तीन टकक्केंपेक्षा कमी आहे. देशाचा शनिवारचा पॉझिटिव्हिटी रेट 2.25 टक्के इतका होता.

Also Read: ‘ही चलाखी राज्यात चालणार नाही’; पवारांनी फडणवीसांना सुनावलं

एकूण कोरोनाबाधित रुग्ण – 3.08 कोटी

उपचाराधीन रुग्ण – Total active cases: 4,54,118

एकूण कोरोनामुक्त Total discharges: 2,99,75,064

एकूण मृत्यू – Death toll: 4,08,040

एकूण लसीकरण Total Vaccination : 37,60,32,586

10 जुलै 2021 पर्यंत देशात 43 कोटी 8 लाख 85 हजार 470 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तर शनिवारी 18 लख 43 हजार 500 जणांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची मोहीम सुरु करण्यात आली आहे. 18 वर्षांपुढील नागरिकांसाठी मोदी सरकारने मोफत लसीकरण मोहिम राबवली आहे. कोरोना विषाणूला हरवायचं असेल तर लसीकरण हाच प्रभावी पर्याय असल्याचं तज्ज्ञाचं मत आहे. आतापर्यंत 37 कोटी 60 लाख 32 हजार 585 लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. मागील 24 तासांत देशात 37 लाख 23 हजार 367 डोस देण्यात आले आहेत.

राज्यात शनिवारी 8,296 कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 6,026 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 59,06,466 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,14,000 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.05% झाले आहे. दरम्यान, महाराष्ट्रात शनिवारपर्यंत 3 कोटी 59 लाख 75 हजार 367 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. दि. 9 जुलै 2021 रोजी 1,97,208 लाभार्थ्यांचं लसीकरण करण्यात आले.

शनिवारी 200 मृत्यू झाले. मात्र त्यासह जुन्या 538 मृत्यूंची नोंद देखील करण्यात आली. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा 1,25,034 इतका झाला. त्यामुळे गेल्या दोन दिवसात राज्यात पडली. त्यात 856 जुन्या अतिरिक्त मृत्यूंचा समावेश होता. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर उशिराने अद्ययावत होत आहेत. जुन्या अतिरिक्त मृत्यूंचा समावेश त्या त्या वेळी राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या वाढली आहे असे सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

देशातील 8 राज्यांमध्ये कडक लॉकडाउन लावण्यात आला आहे. यामध्ये पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिसा, तामिळनाडू, मिजोरम, गोवा आणि पुडुचेरी या राज्यांचा समावेश आहे. या राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

देशातील 23 राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आंशिक लॉकडाउन लावण्यात आलेला आहे. येथे निर्बंधासोबत सूट देण्यात आली आहे. काही ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्यामुळे निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहेत. छत्तीसगढ, कर्नाटक, केरळ, बिहार, दिल्ली, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, हरियाणा, पंजाब, जम्मू-कश्मीर, लडाख, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, सिक्किम, मेघालय, नगालँड, आसम, मणिपूर, त्रिपुरा, आंध्रप्रदेश आणि गुजरात या राज्यात आंशिक लॉकडाउन लावण्यात आलेला आहे.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here