अनेक मुलींकडे खूप फॅशनेबल कपडे असतात, परंतु रोज कोणती ड्रेसिंग करायची यात कम्फ्युज होऊन जातात. ही समस्या सामान्यत: प्रत्येक मुलीची असते, परंतु आज आम्ही आपल्याला अशा काही टिप्स देऊ, ज्यामुळे तुम्हाला कपडे सिलेक्ट करण्याची अडचण येणार नाही. यासाठी, तु्म्हाला फक्त थोडासा स्मार्टनेसपणा दाखवावा लागेल आणि तुमच्या वॉर्डरोबमध्ये काही कपडे ठेवायला हवेत. हे असे काही कपडे आहेत जे प्रत्येक मुलीच्या वॉर्डरोबमध्ये असावेत.

ब्लॅक लेगिंग्ज:

आपल्या वॉर्डरोबमध्ये ब्लॅक लेगिंग्ज जरूर ठेवा, कारण ती कुर्ती, लाँग टॉप, लाँग टी-शर्ट आणि स्कर्ट टॉपवर वापरू शकता. आरामदायक काहीतरी वापरण्याचे विचार करत असाल तर लेगिंग्ज हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही प्रवास करताना किंवा कुठेही फिरताना ब्लॅक लेगिंग्ज जरुर वापरू शकता.

डार्क ब्लू आणि ब्लॅक जीन्स:

प्रत्येक मुलीच्या वार्डरोबमध्ये डार्क ब्लू जीन्स कंम्पलसरी असली पाहिजे, कारण ती कधीही फॅशनच्या बाहेर जात नाही. जेव्हा जेव्हा आपल्याला कोणती ड्रेसिंग करायची ते समजत नाही, तेव्हा तुम्ही कोणत्याही टी-शर्ट, शर्ट किंवा कुर्तीसह टीमअप करू शकता आणि ती जीन्स वापरू शकता.

डेनिम जॅकेट:

प्रत्येक हिवाळ्यामध्ये जॅकेटचा ट्रेंड बदलतो, परंतु डेनिम जॅकेट कधीच आउट ऑफ फॅशन होत नाही. प्रत्येक मुलीच्या वॉर्डरोबमध्ये डेनिम जॅकेट असणे आवश्यक आहे. तुम्ही हे नियमित टी-शर्ट, प्लेन टॉप, मॅक्सी ड्रेस आणि शॉर्ट ड्रेससह देखील घालू शकता. हे तुम्हाला एक परिपूर्ण, कॅज्युअल आणि स्मार्ट लुक देते.

व्हाइट शर्ट:

एकाच लूकने अनेकजण कंटाळतात, ज्यामुळे ते त्या कपड्यांकडे इग्नोर करू लागतात. तर तोच तोच पणा बदलण्यासाठी तुमच्या वॉर्डरोबमध्ये नक्कीच व्हाइट शर्ट ठेवा. वेगवेगळ्या बॉटम वियर घालून तुम्ही एक वेगळा लूक करू शकता. तुम्ही व्हाइट शर्टवर पँट, जीन्स, प्लाझो आणि स्कर्टसह घालू शकता.

ब्लेझर:

ब्लेझर हे ऐकायला तुम्हाला बोरिंग वाटेल परंतु जेव्हा तुम्हाला कुठेतरी फॉर्मल्सपणे जावे लागेल तेव्हा ते तुम्हाला ब्लेझर एक एलीगेंट लुक देईल. परंतु हे लक्षात ठेवा की तुम्हाला ब्लेझर फिट बसले पाहिजे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here