नागपूर : आपल्यापैकी प्रत्येकजण कोरोनापासून (coronavirus) बचाव करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. सर्व सुरक्षा उपायांचे अनुसरण करा, वारंवार हात धुवा आणि मुखवटे (mask) घाला. सार्वजनिक ठिकाणी मुखवटा घालणे आता अनिवार्य झाले आहे. काही राज्यांमध्ये मुखवटा न घालण्याची शिक्षा आहे. परंतु, मुखवटा सुरक्षा प्रदान करीत असताना त्याचे काही तोटे देखील आहेत. बराच काळ मास्क लावल्याने त्वचेचे नुकसान (Skin damage) आणि मुरुमांसारख्या समस्या देखील उद्भवू लागल्या आहेत. तेव्हा मास्कनेपासून आपल्याला कसा बचाव करता येईल हे आपण आज जाणून घेणार आहोत. (how-to-use-a-mask)

मास्क लावल्याने त्वचेवरील घाण आणि तेल मास्कच्या खाली अडकतात. यामुळे ब्रेकआउट्स होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच फेस वॉश करणे फार गरजेचे होऊन जाते.
मास्कचा योग्य वापर करा. तुम्ही डिस्पोजेबल मुखवटा वापरत असाल तर एकदा वापरल्यानंतर तो फेकून द्या.
मास्कमुळे झालेल्या मास्कनेपासून बचाव करण्यासाठी तुम्ही उपचार करीत असाल तर तोपर्यंत मेकअप करणे टाळा.
डिस्पोजेबल मास्कपेक्षा कपड्याचा मुखवटा वापरा. हे मास्क रोज धुवत जा. यामुळे जंतूंचा फैलाव होण्याचा धोका कमी होतो.
मास्क विकत घेताना केवळ फॅब्रिकचा घ्या. सुती किंवा मऊ कपड्यांचा मास्क घेणे टाळा
त्वचेचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक चार तासांनी १५ मिनिटांसाठी मुखवटा काढा.
सूर्यप्रकाश सर्वोत्तम जंतुनाशक आहे. कोणत्याही साबणाने किंवा डिटर्जंटने मास्क धुण्याऐवजी कमीतकमी चार तास उन्हात ठेवा.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here