काही लोकांच्या भूवया दाट असतात तर काहींच्या विरळ. पर्फेक्ट आयब्रोसाठी हे घरगुती उपाय नक्की ट्राय करा. जर तुमची स्किन सेंसिटिव्ह असेल किंवा यापैकी कोणत्याही घटकांची अॅलर्जी तुम्हाला असेल तर, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच यांचा वापर करा.

नारळाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ई असते. जे आपल्या आयब्रोच्या वाढीसाठी खूप चांगले असतात. भुवयांच्या वाढीसाठी आणि त्यांना मॉइस्चर मिळण्यासाठी नारळाचे तेल आयब्रोला लावावे.
रात्री जोपायच्या आधी आयब्रोला पेट्रोलियम जेली लावावी. पेट्रोलियम जेलीमुळे आयब्रोची ग्रोथ होते.
रोज रात्री दूध भूवयांना लावल्याने आयब्रो दाट होतात.
अंड्यामधील बलक अठवड्यातूनव दोन वेळा आयब्रोवर लावावे. त्याने आयब्रोचे केस सिल्की होण्यास मदत होते.
आयब्रोला नैसर्गिक कोरफड जेल वापरण्याऐवजी आपण बाहेरील ब्रँडमधून जेल वापरू शकता पण नियमीत पणे कोरफड जेल वापरण्याने तुमच्या भूवया दाट होतील.
मेथी रात्रभर पाण्यामध्ये भिजवावी. सकाळी त्या भिजवलेल्या मेथीची पेस्ट करून आयब्रोला लावावी.
कांद्याचा रस 10 मिनीट आयब्रोला लावल्यानंतर मसाज करावा. त्यानंतर एक तासांने आयब्रो धुवावे. यामुळे तुमच्या भूवया सिल्की होती.
कॅस्टर ऑइल आयब्रोला 10 मिनीटे लावून मसाज करावा. त्यानंतर 30 मिनीटांनंतर ते धूवून टाकावे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here