सामान्य नागरिकांच्या लसीकरणाला उद्यापासून होणार सुरूवात

मुंबई: लसीअभावी गेल्या दोन दिवसांपासून बंद असलेल्या लसीकरणाची मोहिम (Vaccination Drive) सोमवारपासून (Monday) पुन्हा सुरू होणार आहे. राज्य सरकारकडून मुंबई पालिकेला 85 हजार लसीचे डोस प्राप्त झाले आहेत. त्यासोबत, आता गर्भवती महिलांचेही (Pregnant) लसीकरण मुंबईत केले जाणार आहे. मुंबई महानगरपालिका (BMC) गुरुवारपासून गर्भवती महिलांच्या लसीकरणाला प्रारंभ करणार आहे. (Mumbai BMC to vaccinate pregnant women from Thursday)

Also Read: “सत्ता टिकवण्यासाठी हिंदुत्व तर सोडलंच आहे, पण किमान…”

महानगरपालिकेचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, गर्भवती महिलांना लस देताना कर्मचार्‍यांना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात याविषयी प्रशिक्षण दिले जात आहे. गुरुवारपासून गर्भवती महिलांचे लसीकरण होईल आणि सोमवारपासून मुंबईतील महापालिका केंद्रांवरही लसीकरणाचे काम सुरू होईल. शनिवारी केवळ खासगी केंद्रांवर लसीकरणाचे काम सुरू राहिले. शनिवारी खासगी केंद्रांवर 48,393 लोकांना लस देण्यात आली असून, यासह शहरातील एकूण लसीकरणाची संख्या 60 लाख 9 हजार 25 वर पोहोचली आहे.

Also Read: “आम्ही भाजप नेत्यांना ‘चंपा’ किंवा ‘टरबुज्या’ म्हणणार नाही”

Corona Vaccination

मुंबईतील गर्भवती महिलांना कोरोनाच्या संसर्गापासून वाचवण्यासाठी पालिकेने त्यांच्या लसीकरणाची तयारी पूर्ण केली आहे. या गर्भवती महिलांच्या लसीकरणासाठी पालिकेने काही केंद्रांची निवड केली असून यामध्ये पालिकेच्या मॅटर्निटी होमचा समावेश आहे. जवळपास 25 ते 30 केंद्रांमध्ये हे लसीकरण होईल. डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, गर्भवती महिलांच्या लसीकरणासाठी महापालिकेने प्रमुख रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये तसेच, मॅटर्निटी होमसह शिवाय, ज्या रुग्णालयांमध्ये महिलांची प्रसुती होते अशा उपनगरीय रुग्णालयांमध्ये लसीकरणाची सोय केली गेली आहे.

Also Read: १०० कोटी खंडणी वसुली: सचिन वाझेचा ‘ईडी’ने जबाब नोंदवला

या केंद्रांवर गर्भवती महिलांना लसीकरणासाठी स्वतंत्र रांग आणि बसण्याची व्यवस्था असेल. शिवाय, केंद्रावर लसीचे फायदे आणि त्याचा प्रभाव नमूद करणारे लसपत्रिका उपलब्ध असतील. मुंबईत दीड लाखांहून अधिक गर्भवती महिला आहेत. गर्भवतींचा लसीकरणासाठी वाढलेल्या प्रतिसादानुसार केंद्रांमध्ये वाढ केली जाईल, असेही डॉ. गोमारे यांनी सांगितले आहे.

(भाग्यश्री भुवड, संपादन- विराज भागवत)

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here