मुंबई – नोरा फतेही (nora fatehi) हे नाव आता बॉलीवूडसाठी (bollywood) नवीन नाही. बॉलीवूडमध्ये सध्याची आघाडीची डान्सर म्हणून तिचं नाव घ्यावं लागेल. साकी साकी गाण्यामध्ये नोरानं कमाल केली होती. त्यामुळे तिला वेगळी ओळख मिळाली. आता ती वेगवेगळ्या रिय़ॅलिटी शो मध्ये परिक्षक म्हणून दिसते. सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असणारी नोरा चाहत्यांच्या आवडीचा विषय आहे. तिचे फोटो पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असल्याचे दिसून आले आहे. आताही तिचं एक फोटोसुट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ( actress nora fatehi called indian kim kardashian because of her beauty)

नोराला आता जेवढ ग्लॅमरलस आहे तेवढं यापूर्वी नव्हतं. तिचा प्रवास मोठा संघर्षाचा आहे. तिलाही मी टू सारख्या प्रकाराला सामोरं जावं लागल्याचं तिनं सांगितलं होतं.
नोरा ही तिच्या अभिनयापेक्षा डान्सर म्हणून अधिक लोकप्रिय आहे. तिनं आपल्या डान्समुळे मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग आहे. ती तिच्या सुंदर दिसण्यामुळे देखील प्रसिद्ध आहे. नोरानं अलीकडे एक बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता.
नोराचे वेगवेगळ्या ड्रेसमधील फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. यापूर्वीच्या तिच्या फोटोजला देखील चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स दिल्या होत्या.
नोराचा ड्रेसिंग सेन्स हा जबरदस्त आहे. त्यामुळे तिला मिळणारा प्रतिसादही तितक्याच मोठ्या प्रमाणात मिळतो. जेव्हा ती चाहत्यांसमोर येते तेव्हा तिची क्रेझ वाढायला लागते. असे दिसून आले आहे.
नोरानं आपल्या करिअरची सुरुवात ही रोर टायगर्स ऑफ द सुंदरबन्स या चित्रपटापासून केली होती. त्यानंतर तिनं तेलुगू टेम्पर नावाचा चित्रपट केला. यापाठोपाठ ती तेलुगू चित्रपट किक 2 आणि बाहूबली मध्येही दिसली होती.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here