अनेक लोक टॅटू काढतात. काही लोक डिझाइनचा टॅटू काढतात तर काही लोक त्यामध्ये काही तरी संदेश लिहीतात. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी टॅटू काढला आहे. काही कलाकरांनी टॅटू काढण्यामागचे कारण मुलाखतींमध्ये सांगितले आहे. पाहूयात असे काही बॉलिवूड कालाकार ज्यांचे टॅटू काढण्यामागे स्पेशल कारण आहे.

अभिनेता अर्जुन कपूर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. अर्जुनने टॅटू त्याच्या आवडत्या व्यक्तीसाठी काढला आहे. अर्जुनच्या आईचे 25 मार्च 2012 रोजी कॅन्सरमुळे निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ अर्जुनेने त्याच्या हातावर टॅटू काढला आहे.
दीपिका पदूकोणने ‘आर के’ या नावाचा टॅटू पाठिवर काढला आहे. हा टॅटू तिने अभिनेता रणबीर कपूरला डेट करत असताना काढला होता. दीपिकाने तिच्या पायावर तिच्या नावाचा शॉर्ट फोर्म ‘डी पी’ (DP) असे लिहीलेला टॅटू काढला आहे.
सैफ अली खानने त्याच्या हातावर त्याची पत्नी करीनाच्या नावाचा टॅटू काढला आहे.एका मुलाखतीमध्ये टॅटू काढण्यामागील कारण सांगताना तो म्हणाला ‘मला माझे करीनावर असलेले प्रेम व्यक्त करायचे होते. त्यासाठी मी हा टॅटू काढला’.
अभिनेता वरूण धवनने त्याच्या कानामागे 24 असे लिहीलेला टॅटू काढला आहे. यामधील 2 हा लाल रंगाने लिहीला असून 4 हा काळ्या रंगाचा आहे. वरूणने हा टॅटू काढण्यामागील कारण अजून स्पष्ट केले नसून त्याचे चाहते असा अंदाज लावत आहेत की वरूणची जन्म तारीख 24 (24 एप्रिल 1987) असल्यामुळे त्याने हा टॅटू काढला आहे.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने बुडापेस्टमध्ये ‘फोर्स- 2’ या चित्रपटासाठी शूटिंग करत असताना टॅटू काढला होता. पायावर एका विशिष्ट डिझाइनचा हा टॅटू काढण्यामागील कारण सोनाक्षीने अजून तिने स्पष्ट केले नाही.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here