रत्नागिरी – येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगणामधील गाळ्यांच्या लिलावावेळी लागलेल्या बोलीने काल गुरूवारी सर्वच आवाक् झाले. 11 पैकी पाच गाळ्यांवर आज बोली लावण्यात आली होती. पालिकेने आठ लाख रुपये अनामत ठेवली आहे. त्याच्यावर ही बोली लागली. या प्रक्रियेत एका गाळ्याची लाखात बोली लागली; मात्र गाळा नंबर पाचच्या बोलीने कहरच केला. त्या गाळ्याला उत्तम चव्हाण नामक व्यापाऱ्याने बोली चढवत चाळीस, पन्नास लाख नव्हे; तर तब्बल 75 लाखांची बोली लावल्याने अधिकारीदेखील चक्रावले. या गाळ्यांना सोन्याची किंमत आल्याने पालिकेच्या उत्पन्नात चांगलीच भर पडली आहे.
पालिकेच्या मालकीचे छत्रपती शिवाजी क्रीडांगणमधील 11 गाळे आहेत. या गाळ्यांचा करार तीन वर्षांपुर्वीच संपुष्टात आला. करार संपुष्टात आला तरी बेकायदेशीरपणे या गाळ्यांचे भाडे भरून घेतले जात असल्याचा प्रकार उघड झाला. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. अखेर न्यायालयाने पालिकेच्या बाजूने निकाल दिला. पालिकेने अकरा गाळ्यांसाठी नव्याने निविदा प्रक्रिया करण्याचे आदेश दिले. निविदा प्रक्रिया झाल्यानंतर याला चांगला प्रतिसाद मिळाला. अकरा गाळ्यांच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला. अकरा गाळ्यांसाठी तब्बल 70 पेक्षा अधिक निविदा पालिकेला ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झाल्या.
हे पण वाचा- कसा सोडणार मोह…कसे आणणार भावनांवर नियंत्रण?
या गाळ्यांना आठ लाख रुपये अनामत आणि 24 हजार रुपये मासिक भाडे इतका वाजवी दर निश्चित झाला. अनामत रक्कम आणि भाडेदरात मोठी वाढ केली असतानाही व्यापाऱ्यांनी गाळा खरेदीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निविदा भरण्याची अंतिम तारीख ओलांडून गेल्यानंतर निविदा भरणाऱ्यांना बोली पद्धतीने गाळा भाडे तत्त्वावर घेण्यासाठी आज बोलावण्यात आले. अनामत रक्कमेपासून पुढे बोली लावण्यास सुरवात झाली.
क्रीडांगणामधील अकरापैकी पाच गाळ्यांसाठी बोली पद्धतीने लिलाव प्रक्रिया घेण्यात आली. पाच गाळ्यांच्या बोली प्रक्रियेत गाळा क्रमांक पाच, ज्या गाळ्यात आनंद स्वीट मार्ट दुकान आहे, त्या गाळ्यासाठी 75 लाख इतकी बोली लागली आहे.
हे पण वाचा- येथे मिळतेय स्वातंत्र्यातसुध्दा काळ्या पाण्याची शिक्षा
ऊर्वरित गाळ्यांची बोली
याशिवाय गाळा क्रमांक दोनसाठी सदाशिव चौगुले यांनी 17 लाख 66 हजार, गाळा क्रमांक चार साठी तेज कुरीअर 24 लाख 66 हजार, गाळा क्रमांक 15 साठी विशाल जाधव यांनी 20 लाख आणि गाळा क्रमांक आठसाठी सात लाख 86 हजारांची बोली लावली आहे.

News Story Feeds