सर्व परिमंडळीय उप आयुक्तांची केली कानउघाडणी

मुंबई: मनसेचे संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटरवरून एक व्हिडीओ पोस्ट केला होता. मुंबईत सध्या तिसऱ्या स्तराचे निर्बंध लागू असून अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने चारपर्यंतच उघडी ठेवण्याची परवानगी आहे. पण मनसेच्या म्हणण्यानुसार, मुंबईतील दुकाने ही चारनंतरदेखील सर्रास उघडी ठेवली जात आहेत. बारपाठोपाठ आता दुकानदारांकडूनही वसूली केली जात असून त्याचं एक रेटकार्डही असल्याचा आरोप देशपांडे यांनी केला. मोठ्या दुकानांकडून ५ हजार , मध्यम दुकानांकडून २ हजार तर छोट्या दुकानांमधून १ हजाराची वसूली केली जात असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला होता. याची गंभीर दखल घेत मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सर्व परिमंडळीय उप आयुक्तांना पत्र लिहून कानउघाडणी केली. (MNS Sandeep Deshpande Video of Shops timing goes Viral Police Vishwas Nangare Patil pens down letter)

Also Read: मुंबईत बारपाठोपाठ दुकानदारांकडूनही वसुली? मनसेनं सांगितला ‘रेट’

‘कोविड-१९’च्या अनुषंगाने लागू झालेले निर्बंधांची अंमलबजावणी करण्याबाबत विश्वास नांगरे पाटील यांनी

Vishwas Nangare Patil Letter

Also Read: “सोनिया सेनेचे प्रवक्ते संजय राऊतजी…”; चित्रा वाघ यांची टीका

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच देशपांडे यांनी लॉकडाउनवरून सरकार आणि विरोधकांना लक्ष्य केलं होतं. केवळ विरोध दर्शवून गोष्टींची उत्तर मिळू शकत नाहीत. प्रश्नांची उत्तर मागण्यासाठी विरोधी पक्षाने जाब विचारायला हवा. लोकांच्या अनेक समस्या आहेत पण त्याबद्दल सत्ताधारी आणि विरोधक बोलले नाहीत. त्याउलट विधीमंडळाच्या कामकाजावर बहिष्कार टाकल्यानंतर विरोधकांनी बाहेर आपली वेगळी विधानसभा भरवली आणि आपले विषय पुढे रेटले. हे चुकीचे आहे, अशा आशयाचे ट्वीट करत देशपांडे यांनी नाराजी व्यक्त केली होती.



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here