दाभोळ – दापोली अर्बन बॅंकेवर हॅकरने केलेल्या सायबर हल्ल्यात बॅंकेचे कोणतेही आर्थिक नुकसान झाले नसले तरी या हल्ल्यामुळे आपल्यावरही अशी वेळ येऊ शकते, हे ध्यानात आल्याने सर्व बॅंकर जागे झाले आहेत. बॅंकेच्या सिस्टीमचा अभ्यास करून हॅकरने बॅंकेच्या सिस्टीममध्ये कसा प्रवेश केला, हे शोधून काढण्यासाठी आता तज्ज्ञ येणार आहेत.
हे पण वाचा – बेवकूफ, जाहील, तू कोणाची नोकरी करत आहेस ? : जावेद अख्तर
हॅकरने केलेल्या सायबर हल्ल्यामुळे बॅंक प्रशासन व अधिकारी अजूनही सावरलेले नाहीत. पोलिसांनी तपास सुरू केला असला तरी या तपासाला मर्यादा असल्याचे स्पष्ट झाले आहेत. या संदर्भात दापोली पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता या प्रकरणाचा तांत्रिक तपास करण्यासाठी आमचेकडे संगणक क्षेत्रातील तज्ज्ञ नाहीत. त्यामुळे तज्ज्ञ आम्हाला हायर करावे लागणार आहेत. आम्ही पुणे येथील या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधला आहे. ते एक दोन दिवसात दापोलीत येतील. त्यानंतर बॅंकेच्या सिस्टीमचा अभ्यास करून हॅकरने बॅंकेच्या सिस्टीममध्ये कसा प्रवेश केला, हे शोधून काढले जाणार आहे. हॅकरने या हल्यासाठी वापरलेला मोबाईल क्रमांकाचे डिटेल्स आमच्याकडे आले असून त्याचाही तपास सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले.
हे पण वाचा – येथे मिळतेय स्वातंत्र्यातसुध्दा काळ्या पाण्याची शिक्षा
अशा प्रकारचे हल्ले झाल्यास त्याची सूचना लगेच मिळावी, यासाठी बॅंकेच्या डेटासेंटरमध्ये आणखी एक सर्व्हर बसविण्यात येणार असल्याची माहिती बॅंकेचे चेअरमन जालगावकर यांनी दिली. आता बॅंकेच्या सिस्टीममधील फायरवॉलचे ऑडिटही करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
दापोली अर्बन बॅंकेने अशा प्रकारच्या सायबर हल्ल्यात बॅंकेचे नुकसान होऊ नये, यासाठी पाच कोटींचा विमा उतरवला आहे.
– जयवंत जालगावकर, चेअरमन, दापोली अर्बन बॅंक
मर्यादा झाल्या उघड
दापोली अर्बन बॅंकेने बॅंकेतील संगणकीय सिस्टीममध्ये सायबर हल्ला झाल्याची माहिती दापोली ठाण्यात सोमवारी (ता. 17 )सायंकाळी एका पत्राद्वारे दिली होती, मात्र त्याची दखल मंगळवारी (ता.18) सायंकाळी म्हणजे 24 तासांनी घेण्यात आली. त्यामुळे पोलिसांच्या मर्यादा उघड झाल्या आहेत.

News Story Feeds