रविवारी रात्री उशिरा घडली दुर्घटना

काशीद: अलिबाग (Alibag) आणि मुरुड (Murud) यांना जोडणाऱ्या रस्त्यावर काशीदजवळ असलेला जुना पूल कोसळल्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली. काशीद (Kashid) येथील नाल्यावर हा पूल होता. तो कोसळल्याने १ कार आणि मोटरसायकल अशी २ वाहने घटनास्थळी अडकली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला तर काहींना किरकोळ जखमा झाल्या. (Alibag Murud Road Kashid bridge Collapsed due to heavy rainfall)

Also Read: सायन-पनवेल मार्गावर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ‘ट्रॅफिक जाम’

अडकलेली दोन्ही वाहने आणि सहा प्रवासी बाहेर काढण्यात आले, पण त्यापैकी गंभीर जखमी झालेल्या एका प्रवाशाचा मृत्यू झाला. तसेच, पूल वाहून गेल्याने वाहतुक मात्र विस्कळीत झाली. पूल वाहून गेल्याच्या दुर्घटनेनंतर मुरुडकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांना रोहे-सुपेगाव मार्गे पाठवण्यात येत आहे. प्रशासनाने प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केलं आहे.

Kashid-Bridge

रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मुरुड तालुक्यात पावसाची संततधार सुरु होती. पावसाचा जोर हळूहळू वाढला आणि त्यामुळे नदीतील पाणी अतिशय जोरदार वेगाने वाहण्यास सुरू झाली. पाण्याच्या वेगाने सुमारे ५० वर्षे जुना असलेल्या या पुलाचा काही भाग पाण्याबरोबर चक्क वाहून गेला.

Kashid-Bridge

पूल वाहून गेला, त्यामुळे १ कार आणि १ दुचाकीदेखील वाहून जात होते. पण या वाहनांना बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेत १ मोटारसायकलस्वार पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झालेली व्यक्ती एकदरा गावाजवळचा रहिवासी असून त्याचे विजय चव्हाण असे होते, अशी माहिती मुरूडचे नायब तहसिलदार रविंद्र सानप यांनी यावेळी दिली आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here