गेली दोन दिवस कोकणात पाऊस आहे. यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्गातील नद्यांना पूर आला आहे. राजापुरातील अर्जुना-कोदवली नद्यांना पूर येवून पुराच्या पाण्याने राजापूर शहराला यावर्षी दुसर्यांदा वेढा घातला आहे. गेल्या सुमारे सात तासाहून अधिक काळ पूरस्थिती कायम राहीली आहे. या पुरस्थितीमुळे तालुक्यातील नद्यांच्या काठावरील गावांचा संपर्क तुटला आहे. तर, पूरस्थितीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच , सिंधुदुर्गातील खारेपाटण, भूईबावडा, वैभववाडी परिसरात कालपासून झालेल्या पावसामुळे विजयदुर्ग खाडीला पूर आला असून सुख नदीने रौद्ररूप धारण केले आहे.
पुराचे पाणी खारेपाटण बाजारपेठेत शिरले. नदीपात्रात बदल झाल्याने पुराच्या पाण्याने शहराला वेढा दिला आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. हे सर्व छायाचित्रण रत्नागिरी चे बातमीदार राजेंद्र बाईत व सिंधुदुर्गचे छायाचित्रकार रमेश जामसंडेकर यांनी कॅमेरात कैद केले आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गातील पूरस्थितीची ही चित्रमय झलक.ratnagiri-sindhudurg-rain-2021-update-photo-story-kokan-news











Esakal