काही वेळा वैयक्तिक कारणांमुळे कलाकार त्यांच्या पार्टनरसोबत घटस्फोट घेतात किंवा ब्रेक अप करतात. काही कलाकार आधीच्या सर्व गोष्टी विसरून दुसऱ्यांदा प्रेमात देखील पडतात. पाहूयात असे मराठी कलाकार जे दुसऱ्यांदा प्रेमात पडले.

‘लग्नाची वाईफ वेडिंगची बायको’ मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळवणारा कलाकार विजय आंदळकरचे पहिले लग्न अभिनेत्री पूजा पुरंदरेशी झाले होते. पूजा सध्या ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत काम करत आहे. विजय आणि पूजा यांचा संसार फार काळ टिकला नाही. त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नुकताच विजयने त्याची ‘लग्नाची वाईफ वेडिंगची बायको’ या मालिकेतील सहकलाकार रुपाली झंकारसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. विजय आणि रूपाली यांचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी पार पडला. लवकरच ते लग्न करणार आहेत.
अभिनेता सिद्धार्थ चांदेकरचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. त्यापैकी एक म्हणजे मुग्धा परांजपे. एका रिपोर्टनुसार सिद्धार्थ आणि मुग्धा यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केले. पण काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी ब्रेक-अप केले. त्यानंतर सिद्धार्थने अभिनेत्री मिताली मयेकरला प्रपोज केले. या दोघांनी पुण्यातील प्रसिद्ध ‘ढेपे वाडा’ येथे 24 जानेवारी 2021 लग्न केले.
अभिनेत्री मिताली मयेकरने जिगरबाज या मालिकेमधील अभिनेता श्रेयस राजेला काही महिने डेट केले. पण या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. मिताली आणि श्रेयसने सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो देखील केले . त्यानंतर मितालीने सिद्धार्थ चांदेकर सोबत लग्न केले.
मराठी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेता शशांक केतकरने अभिनेत्री तेजश्री प्रधानसोबत 2014 साली लग्न केले. या दोघांची होणार ‘सून मी या घरची’ या मालिकेमधील केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. पण दोघांनी लग्नाला एक वर्ष होण्याआधी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. शशांकने 2017 साली प्रियांका ढवळेसोबत लग्न केले.
अभिनेता संग्राम सामेळने 2016 मध्ये ‘रूंजी’ फेम अभिनेत्री पल्लवी पाटीलशी लग्न केले होते. काही वर्षानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर संग्रामने त्याची मैत्रीण आणि डान्सर श्रद्धा फाटकसोबत लग्न केले.
अभिनेता सुयश टिळक आणि डान्सर आयुशी भावे यांचा नुकताच साखरपुडा पार पडला . याआधी सुयश ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील अभिनेत्री अक्षया देवधरच्या रिलेशनशिपची चर्चा सुरू होती.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here