EURO 2020 : ख्रिस्तियानो रोनाल्डोचा संघ यंदाच्या युरो कपमध्ये फायनलपर्यंत पोहचला नाही. बाद फेरीतीच गत विजेत्या पोर्तुगालचा खेळ खल्लास झाला. पोर्तुगाल फायनलपर्यंत पोहचली नसली तरी रोनाल्डोच्या चाहत्यांना फायनलनंतर आनंदाचा क्षण अनुभवायला मिळाला. याच कारण ख्रिस्तियानो रोनाल्डोने यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक गोल करत गोल्डन बूटवर कब्जा केला. मिनी वर्ल्ड कप समजल्या जाणाऱ्या युरोमध्ये त्याने पहिल्यांदाच गोल्डन बूटचा किताब पटकवलाय.
साखळी फेरीतील प्रत्येक सामन्यात रोनाल्डोने संघासाठी गोल करुन दिला. स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात त्याने हंगेरी विरुद्धच्या सामन्यात 20 गोल डागले होते. जर्मनी विरुद्धच्या साखळी सामन्यात पोर्तुगालला 4-2 अशा पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात रोनाल्डोने 15 व्या मिनिटात संघाला आघाडी मिळवून दिली होती. पण सरशेवटी सामना जर्मनीने जिंकला. वर्ल्ड चॅम्पियन फ्रान्स विरुद्धच्या बरोबरीच्या सामन्यात रोनाल्डोने 2 गोल डागले होते. त्याने स्पर्धेत एकूण पाच गोल डागले. याशिवाय एका गोलसाठी असिस्ट केले होते. बेल्जियम विरुद्धच्या सामन्यात रोनाल्डो गोल करण्यात अपयशी ठरला. आणि पोर्तुगालचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला.

Also Read: ICC ट्रॉफी सोडा IPL ही जिंकली नाही; विराट नेतृत्वावर रैनाचे बोल
रोनाल्डोने 360 मिनिटे मैदानात घालवून एका असिस्टसह 5 गोल डागले. त्याच्यापाठोपाठ या यादीत चेक प्रजासत्ताकचा पॅट्रिक शिक आहे. त्याने 404 मिनिटांच्या खेळात 5 गोल डागले. फ्रान्सचा करीम बेंनझमाने 349 मिनिटांच्या खेळात 4 , स्वित्झर्लंडचा इमील फोर्सबर्ग 371 मिनिटांच्या खेळात 4, बेल्जियमचा रोमेलू लुकाकू 444 मिनिटात 4 गोल डागले.

Also Read: Euro : वर्णभेदाच्या प्रकारानंतर पीटरसननेच काढली इंग्लंडची लायकी
इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन याला रोनाल्डोला मागे टाकण्याची संधी होती. इटलीविरुद्धच्या फायनलपूर्वी त्याच्या खात्यात 4 गोल होते. पण फायनलमध्ये त्याला एकही गोल डागता आला नाही.
Esakal