अनेकांना भटकंती करायला खूप आवडते. त्यात पावसाळा असेल तर विचारायलाच नको. पावसाळ्यात फिरण्यासाठी अनेकजण एक एक महिने आधीच प्लॅन करतात. तर काहीजण कोणत्या ठिकाणी फिरायला जायचे याचाच विचार करत बसतात. या दिवसात पर्यटक पावसाचे दृश्य पाहण्यासाठी नवीन ठिकाणी जाण्याचा प्लॅन करतात. जर तुम्हाला फिरायला जायची इच्छा आहे तर पावसाळ्यात या ठिकाणी अवश्य भेट द्या. चला तर मग त्या ठिकाणांबद्दल अधिक जाणून घेऊयात.

धर्मशाला:
या हिमालयातील उंच पर्वत आणि मठ पाहण्यासाठी वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. धर्मशाळेपासून 5 कि.मी. अंतरावर असलेले मॅकलॉइड गंज देखील या सीजनमध्ये पाहण्यासाठी योग्य आहे. सोलो ट्रॅव्हल किंवा बॅकपॅकरसाठी हे ठिकाण खूप सुंदर आहे.

गोवा:
गोवा हे भारतातील सर्वात रोमॅंन्टीक ठिकाण आहे. पण काहीच लोकांना माहिती आहे की, पावसाळ्यात गोव्यात जाण्याची मजा वेगळीच असते. गोवा समुद्रकिनार्‍यासाठी प्रसिद्ध आहे.
मसूरी:
भारताच्या उत्तराखंड राज्यातील मसुरी हे एक डोंगराळ शहर आहे. मसूरीला पर्वतांची राणी देखील म्हटले जाते. देहरादूनपासून 35 कि.मी. अंतरावर असलेले मसूरी पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. येथे केम्प्टी फॉल, भट्टा फॉल आणि कनातल यासारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता.
माळशेज घाट:
माळशेज घाट हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील पश्चिम घाटांजवऴ प्रसिद्ध असलेला घाट आहे. हे ठिकाण त्याच्या असंख्य तलावांसाठी, खडकाळ म्हणून ओळखले जाते. पावसाळ्यात या ठिकाणी फिरण्यासाठी असंख्य पर्यटक येतात.
महाबळेश्वर:
महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या ठिकाणांपैकी महाराष्ट्रातील महाबळेश्वर हे देखील एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. हे पश्चिम घाटाच्या अगदी जवळ आहे. महाबळेश्वरमध्ये पावसाळ्याच्या महिन्यात जोरदार पाऊस पडतो.
शिमला:
हिमाचल प्रदेशचे सुंदर शहर आणि राजधानी शिमला आहे. बर्फाच्छादित पर्वत, हिरवळ आणि सुखद वातावरण हे शिमल्याचे वैशिष्ट्य आहे. येथेही पर्यटक विविध प्रकारच्या एंडवेंचर्सचा आनंद घेऊ शकतात.
खज्जियार:
हिमाचल प्रदेशात असलेल्या खज्जियारला भारताचे स्वित्झर्लंड असे म्हणतात. तुम्ही शांती आणि नैसर्गिक सौंदर्य पाहू इच्छित असाल तर खज्जियारपेक्षा चांगली जागा कुठेही मिळणार नाही. हे देखील बेस्ट रोमांटिक ठिकाण आहे.
मनाली:
दिल्ली-एनसीआरमध्ये राहणारे लोक मान्सूनमध्ये हिल स्टेशनला भेट देण्याचा विचार करीत असतील तर हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले मनाली शहर परफेक्ट आहे. मनाली हे हिमाचल प्रदेश येथील असून समुद्रसपाटीपासून 6725 फूट उंचीवर बियास नदीच्या काठावर वसलेले आहे.

माउंट अबू:
राजस्थानमधील हिल स्टेशन माउंट अबूचा जुलै महिन्यातील पावसामध्ये आनंद घेता येईल. माउंट आबूमध्ये रॉक क्लाइंबिंग, ट्रेकिंग आणि रॅपलिंग यासारख्या अ‍ॅक्टिव्हिटीचा आनंद घेऊ शकता. कॅम्पिंग आणि ट्रेकिंगशिवाय हॉर्स राइडिंग आणि हॉट एअर बलून अ‍ॅक्टिव्हिटीज येथेही प्रसिद्ध आहेत.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here