घराची सजावट करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी एखाद्या तज्ज्ञांचा सल्लाही आपल्याला घेता येईल. पण तो घेतला नाही तरी काही छोटया छोटया गोष्टी पाळल्या तर लहान घरातही अंतर्गत सजावट आपल्याला कल्पकतेने करता येऊ शकते. वाचा या सोप्या टिप्स….
किचन..
आपल्या आवडीनुसार आणि बजेटनुसार त्याची निवड करता येते. किचन लहान असल्यास ओटय़ाखाली आणि एखाद्या मोकळ्या भिंतीशी स्टोरेज करावं. दुस-या एका भिंतीला जाड फोल्डिंगची फळी बसवावी. त्यावर सनमायका लावला की ती आकर्षक दिसते. तिचा वापर गरजेच्या वेळी टेबल म्हणून करता येईल. गरज नसल्यास हुक काढून भिंतीलगत ठेवता येईल. त्यामुळे टेबलाची जागा अडणार नाही. यासाठी बसायच्या खुर्च्याही फोल्डिंगच्याच वापराव्यात.

कोणत्याही थीमला डोक्यात ठेवा
घराची जागा खूप मोकळी वाटत असेल तर ती भरलेली वाटण्यासाठी घरात लाल, पिवळ्या नारंगी रंगाचा वापर करा. हे रंग उबदार आणि आल्हाददायक वातावरण निर्माण करतात.जर घरात वस्तुंची गर्दी असेल आणि मोकळेपणा हवा असेल तर निळ्या, हिरव्या अश्या गर्द रंगाचा वापर करा. घराची सजावट एका कोणत्याही थीमला डोक्यात घेऊन करा. त्यामुळे घराला एक चांगला लूक येऊ शकतो. ही थीम फर्निचर, भिंत या सारख्या गोष्टींवर आधारित असू शकते.भिंतीसाठी सौम्य गुलाबी रंग वापरल्याने घरात प्रसन्न वाटते. सिलिंग आणि भिंतीसाठी गर्द रंगाऐवजी फिक्कट रंगाचा वापर करा. त्यामुळे घराची जागा असल्यापेक्षा मोठी वाटते.

ड्रॉईंग रूम, बेडरूम
फुलदाणीचे तोंड जर रुंद असेल तर त्यामध्ये फुले ठेवण्याआधी फुलदाणीच्या तोंडापाशी बारीक जाळी लावा आणि नंतर त्यात फुले ठेवा त्यामुळे सर्व फुले एकसारखी राहतील आणि फुलदाणी आकर्षक वाटेल. भिंतीवर उभ्या पट्ट्यांचा वापर करा. त्यामुळे घराची उंची अधिक वाटते. बाजारातून काचेचे मोठे जार घेऊन त्यामध्ये काचेच्या गोट्या, रंगीबेरंगी धागे, रिबिन अशा वस्तु टाका आणि जार दिवाणखाना, बेडरुममध्ये ठेवा ही वेगळी वस्तु नक्कीच आकर्षक वाटेल.

फर्निचर, वॉलपेपर
वॉल पेपर काढतेवेळी ते व्यवस्थित निघावे म्हणून व्हिनेगर आणि गरम पाणी एकत्र प्रमाणात घ्या आणि त्या मिश्रणातून स्पंज बुडवून तो वॉल पेपरवर फिरवा. वॉलपेपर सहजरित्या निघेल. सजावटीचे काम करताना घरातील प्रत्येक रुमची सजावट स्वतंत्ररित्या करा. ऐक रुमचे फर्निचर बाहेर काढून दुसऱ्या रुममध्ये ठेवा ते शक्य नसल्यास सर्व फर्निचरच्या मध्यभागी घेऊन ते कपड्याने झाका.
Esakal