जळगाव ः भारतात (India) अनेक जूने पुल असून त्यांचे सौंदर्य (Beauty) पर्यटकांना (Tourists) अजून ही आकर्षित करतात. या पुलांवरून प्रवास (Travel) करणे खूपच रंजक असतो. भारताचा सुंदर पूलाचा विचार केला असता प्रथम रामेश्वरमच्या पंबन पुलाबद्दल (Pamban Bridge of Rameshwaram) बोलले जाते. यासारखे भारतात अनेक पूल आहेत जे पर्यटकांना खूप आकर्षित करतात. त्यामध्ये आसाम (Assam) राज्यामधील कोलिया भोमोरा सेतू (Koliya Bhomora Bridge) जो सोनीतपूर जिल्ह्यातील तेजपूर शहरात आहे. चला जाणून घेवू या सेतू बद्दल..(assam koliya bhomora bridge travel interesting)

Also Read: पंजाबचे जालंधर शहर पर्यटनासाठी आहे खास; जाणून घ्या माहिती

Koliya Bhomora Bridge

पुलावरून प्रवास करणे आकर्षक
आसाम राज्याचे नैसर्गिक सौंदर्य आणि संस्कृती जगात प्रसिद्ध आहे, त्यात कोलिया भोमोरा सेतू प्रभावी स्थान मानले जाते. रात्री किंवा सकाळी या पुलावरून प्रवास करणे हे पर्यटकांना खूप आकर्षित करते. या पुलाच्या वैशिष्ट्याबद्दल सांगायचे झाल्यास, हे नागाव जिल्ह्याला सोनितपूर जिल्ह्याशी जोडतो. त्यामुळे उत्तर-पूर्व राज्यांचा विकास झाला असेही म्हटले जाते.

Koliya Bhomora Bridge

कोलिया भोमोरा सेतूचा इतिहास

कोलिया भोमोरा सेतू सोनीतपूरच्या आसपासच्या शहरांना नुसता जोडत नाही तर तेथील नागरिकांचे जीवन त्यावर अवलंबून आहे. या पुलाचे बांधकाम १९८१ मध्ये सुरू झाले आणि ते पूर्ण होण्यासाठी सहा वर्षे लागली. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन झाले. या पुलाच्या निर्मितीपूर्वी ब्रह्मपुत्र नदीमुळे हे ठिकाण देशाच्या इतर भागांमधून कापले गेले होते. त्यामुळे हा पूल लोकांच्या गरजा आणि त्यांच्या विकासकामे लक्षात घेऊन तयार केला. ३.१५ किमी लांबीच्या या पुलाचे नाव प्रसिद्ध जनरल कोलिया भोमोरा फुकन यांच्या नावावरुन दिले आहे.

Koliya Bhomora Bridge

ब्रह्मपुत्र नदीचे सौंदर्य

जेव्हा पर्यटक या पुलावरून प्रवास करतात तेव्हा त्यांना पुलाखाली ब्रह्मपुत्र नदीचे सौंदर्य खुणावते. तर अनेकांना ब्रह्मपुत्र नदीच्या काठी उभा असलेला हा पूल पहायला आवडतो. ब्रह्मपुत्र नदीवर बांधलेला हा काँक्रीट पूल एका काठाला दुसर्‍या काठाला जोडतो, जो नेत्रदीपक आहे. त्याच वेळी, येथे सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्याचा योग देखील अद्वीतय करणारा आहे. तसेच पुलावरचे रात्रीचे दृश्य बरेच सुंदर आहे.

sunset

या वेळी जावू शकतात..

देशात सद्या कोरोना आजाराचा प्रादुर्भाव सुरू आहे त्यामुळे बहुतांश पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी आहे. कोरोना नंतर जर तुम्हाला कोलिया भोमोरा सेतूला भेट देण्यासाठी नियोजन करू शकतात. त्यासाठी प्रथम तेजपूरला जावे लागेल. तेजपुर हे गुवाहाटीपासून १८४ कि.मी. अंतरावर आहे. जे ब्रह्मपुत्र नदीवर आहे. हे शहर हिरव्यागार डोंगरांनी वेढलेले आहे. येथे खोल दरी असल्याने पर्यटकांन सुट्टी घालविण्याचे सुंदर ठिकाण देखील आहे. येथे ऑक्टोबर ते मार्च दरम्यान तुम्ही सहलीचे नियोजन करू शकतात. तसेच ट्रेन आणि विमान या दोन्ही सुविधेने येवू शकतात.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here