औरंगाबाद : पावसाळा सगळ्यांना हवाहवासा वाटतो. या ऋतूत सगळ्यांना चटपटीत आणि गरमागरम काही तरी खावेसे वाटते. अशा वेळेस प्रत्येकाला कांदा भाजी बनवून खावे वाटते. मात्र सारख तेच खायला कंटाळा येतो. अनेकांना बटाट्याचे भजे आवडत नाहीत. कारण ती क्रिस्पी बनत नाहीत म्हणून. मात्र तुम्हाला माहीत आहे का? बटाटा भजेही स्क्रिपी बनवले जाऊ शकते. आम्ही तुम्हाला बटाटा भजे बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत…

साहित्य
– दोन बटाटे
– ४ चमचे बेसन पीठ
– ३ चमचे तांदळाचे पीठ
– दोन हिरव्या मिरच्या
– तीन चमचे बारीक केलेली कोथिंबीर
– एक छोटा चमचा लाल मिरची पावडर किंवा चिली फ्लेक्स
– चवीनुसार मीठ
– तळण्यासाठी तेल
कृती
– सर्वप्रथम बटाटे पाण्यात टाका.
– बटाटे चांगल्या प्रकारे धुवून घ्या आणि स्टार्च काढा.
– आता बटाट्यात सर्व साहित्य टाका आणि त्यात पाणी टाकू नका.
– तेल गरम करण्यासाठी ठेवा. ते फार गरम होऊ देऊ नका.
– आता छोटे-छोटे पोर्शनमध्ये तळून घ्या.
– त्यानंतर ती तुम्ही आवडीच्या साॅसबरोबर सर्व्ह करा. तुम्हाला हवे असेल तर हिरवी मिरची तळून घेऊन खाण्याचा आनंद घेऊ शकता.
Esakal